TRENDING:

iPhone 15 series मधून युजर्सना नवीन काय मिळणार? थोड्याच वेळात होणार मोठा खुलासा

Last Updated:

यूएसबी टाइप सी : युरोपीयन युनियनच्या नियमांमुळे अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 सीरिजपासून यूएसबी टाइप सीचा वापर करणार असल्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, १२ सप्टेंबर : अ‍ॅपलचा बहुप्रतीक्षित वंडरलस्ट हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार आज (12 सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजता होणार आहे. त्यात काय सादर होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यात कोणत्या गोष्टी जाहीर होऊ शकतात, याची थोडक्यात माहिती घेऊ या.
थोड्याच वेळात आयफोन 15 बाबत मोठा खुलासा
थोड्याच वेळात आयफोन 15 बाबत मोठा खुलासा
advertisement

यूएसबी टाइप सी : युरोपीयन युनियनच्या नियमांमुळे अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 सीरिजपासून यूएसबी टाइप सीचा वापर करणार असल्याची शक्यता आहे. स्टँडर्ड आयफोन 15 मॉडेल्सना अ‍ॅपल सर्टिफाइड केबल्स लागतील आणि त्यांचा चार्जिंग स्पीड मर्यादित असेल. केवळ आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स फास्टर डेटा ट्रान्स्फर स्पीडसह येतील.

अ‍ॅपलने कायम लाइटनिंग पोर्टसारख्या प्रोप्रायटरी पोर्ट्सना प्राधान्य दिलं होतं; मात्र युरोपीय महासंघाने डिव्हाइस कनेक्शन्सच्या स्टँडर्डायझेशनवर भर दिला आहे. त्यामुळे यूएसबी सी पोर्ट हा स्टँडर्ड बनला आहे. त्यामुळे या नियामक दबावाला प्रतिसाद म्हणून अ‍ॅपलने यूएसबी टाइप सी पोर्टची मॉडेल्स आणली आहेत, असं बोललं जात आहे.

advertisement

आयफोन 15 सीरिज : आयफोन 15, 15 प्लस, 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे चार नवे आयफोन्स आज सादर होण्याची शक्यता आहे.

आयफोन 15 आणि 15 प्लस मॉडेल्स ग्लास बॅक आणि अ‍ॅल्युमिनियम साइड्ससह येणं अपेक्षित असून, हायर एंड प्रो व्हर्जन्सना टिटॅनियम डिझाइन असणं अपेक्षित आहे. त्यामुळे फोन्स अधिक टिकाऊ आणि वजनाला 10 टक्के हलके बनण्याची शक्यता आहे, असं ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटलं आहे.

advertisement

प्रो मॉडेल्समध्ये नवीन ए 17 चिपसेट असून, तो चिपसेट 3 नॅनोमीटर प्रोसेसवर तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे बॅटरी लाइफ आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा होणार आहे. बेस व्हॅरिएंट्समध्ये गेल्या वर्षीचे ए 16 चिपसेट्स असण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपल कंपनी प्रो व्हर्जन्सचं उत्पादन करताना स्क्रीनभोवतीची बेझल्स बनवण्यासाठी लो इंजेक्शन प्रेशर ओव्हरमोल्डिंग अर्थात लिपो ही प्रोसेस वापरणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे स्क्रीन साइझ सुधारणार असून, स्क्रीन पातळ होणार आहे.

advertisement

अ‍ॅपल वॉचेस : या वर्षी अ‍ॅपल आपल्या दोन वॉच लाइन्सचे अपडेट्स रिलीज करण्याचं नियोजन करत आहे. अ‍ॅपल वॉच सीरिज 9 आणि अ‍ॅपल वॉच अल्ट्रा या दोन लाइन्सचे अपडेट्स रिलीज होण्याचं नियोजन आहे. वॉच सीरिज 9 41 मिमी आणि 45 मिमी साइझमध्ये येण्याची शक्यता असून, वॉच अल्ट्रा 2 49 मिमी साइझमध्ये येण्याची शक्यता आहे.

advertisement

अ‍ॅपल एअरपॉड्स : एअरपॉड्स प्रोला लाइटनिंग बेस्ड अ‍ॅक्सेसरीज अपडेटेड स्टँडर्ड येण्याची शक्यता आहे. रेग्युलर एअरपॉड्स आणि एअरपॉड्स मॅक्सला यूएसबी सी टाइप चार्जिंग पोर्ट दिले जाणार आहेत.

इयरबड्समध्ये मोठा हार्डवेअर अपग्रेड अपेक्षित नाही; मात्र काही नवी फीचर्स सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे येण्याची शक्यता आहे. त्यात म्यूट आणि अनम्यूट करण्याच्या फीचरचा समावेश आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आयओएस 17, आयपॅडओएस 17, वॉच ओएस 10, टीव्ही ओएस 17 यांचं रीलिज शेड्यूलही जाहीर होण्याच शक्यता आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
iPhone 15 series मधून युजर्सना नवीन काय मिळणार? थोड्याच वेळात होणार मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल