ही कागदपत्रे व्हाट्सअॅपवर बनवली जातील
विवाह प्रमाणपत्र, जातीचा दाखला, जन्म प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह अनेक सरकारी कामे व्हाट्सअॅप गव्हर्नन्स अंतर्गत आणली जातील. लोक या कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतील. त्यांची कागदपत्रे फक्त व्हाट्सअॅपद्वारेच पडताळू शकतील आणि डाउनलोड करू शकतील. ही संपूर्ण प्रक्रिया जलद होईल आणि लोकांना सरकारी विभागांमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
जगातील 5 सगळ्यात छोटे मोबाईल! एक तर इतका लहान की माचिसच्या डब्यातही राहिल, स्मार्टफोनसारखेच फिचर्स
ही सेवा अशा प्रकारे काम करेल
व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मवर AI-पावर्ड चॅटबॉट असेल. ते हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये काम करेल. यूझर्सना मदत करण्यासोबतच, ते संपूर्ण सेवा स्वयंचलित करेल आणि यूझर्सना सर्व विभागांशी संबंधित माहिती देखील प्रदान करेल. सुरुवातीला, या प्लॅटफॉर्मवर 25-30 सेवा एकत्रित केल्या जातील. नंतर, इतर विभाग देखील त्यात सामील होतील. चांगल्या समन्वयासाठी, ते दिल्लीच्या ई-जिल्हा पोर्टलशी जोडले जाईल.
Gmail यूझर्ससाठी मोठा अलर्ट! AI ने होतोय मोठा सायबर अटॅक, असा करा बचाव
ते कसे वापरावे?
सध्या या प्लॅटफॉर्मवर काम सुरू आहे आणि त्याच्या लाँचिंगची माहिती उघड झालेली नाही. लाँच झाल्यानंतर, यूझर्स चॅटबॉटला हायचा संदेश पाठवून अर्ज प्रोसेस सुरू करू शकतील. हा चॅटबॉट यूझर्सना एक फॉर्म देईल. फॉर्म भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर, हा फॉर्म अपलोड करावा लागेल. ही प्रोसेस खूप सोपी असणार आहे.
