हे अॅप पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आहे आणि ब्लूटूथद्वारे एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर थेट काम करते. खास गोष्ट म्हणजे त्याला इंटरनेट, सर्व्हर, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीची आवश्यकता नाही.
ब्लूटूथच्या लिमिटेड रेंजमुळे, असे अॅप सहसा सुमारे 100 मीटर अंतरापर्यंतच काम करते. म्हणून, जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी तुमच्या मित्रांना शोधत असता आणि मोबाईल नेटवर्क योग्यरित्या काम करत नसते अशा परिस्थितीत ते अधिक उपयुक्त ठरेल.
advertisement
'या' डिव्हाइसमध्ये बंद होणार WhatsApp! लगेच करा चेक, यात तुमचा फोन तर नाही?
डोर्सी म्हणतात की त्यांच्या अॅपमध्ये जास्त अंतरावर काम करण्याची क्षमता आहे. हे अॅप जवळच्या इतर लोकांच्या डिव्हाइसद्वारे संदेश फॉरवर्ड करते, ज्यामुळे त्याची रेंज सुमारे 300 मीटर (किंवा 984 फूट) पर्यंत वाढते.
तुम्ही ऑनलाइन नसला तरीही मेसेज प्राप्त होईल
या अॅपमध्ये पासवर्ड सुरक्षित ग्रुप चॅट (ज्याला 'रूम' म्हणतात) ची सुविधा देखील आहे. याशिवाय, ते 'स्टोअर अँड फॉरवर्ड' नावाच्या तंत्रज्ञानाला समर्थन देते, जेणेकरून यूझर ऑफलाइन असला तरीही तो नंतर मेसेज मिळवू शकेल. असे सांगण्यात आले आहे की, आगामी अपडेट्समध्ये वायफाय डायरेक्ट फीचर देखील जोडला जाईल. ज्यामुळे अॅपचा वेग आणि रेंज आणखी सुधारेल.
तुमचं Facebook अकाउंट वापर दुसरं कोणी तर करत नाहीये? असं करा चेक
याशिवाय, लोकांचे लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे मेटाचे व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर सारखे मेसेजिंग अॅप्स मोठ्या टेक कंपन्यांनी बनवले आहेत आणि ते यूझर्सचा पर्सनल डेटा वापरतात.
दुसरीकडे, बिटचॅट पूर्णपणे peer-to-peer म्हणजेच डिव्हाइस टू डिव्हाइस काम करते. यामध्ये, कोणतेही खाते तयार करावे लागत नाही, कोणतीही ओळख (जसे की नंबर किंवा ईमेल) दिली जात नाही किंवा कोणताही डेटा गोळा केला जात नाही. डोर्सी म्हणाले की, या अॅपचे बीटा व्हर्जन आता टेस्टफ्लाइटवर उपलब्ध आहे. सध्या, ते स्टेबल व्हर्जनमध्ये सर्वांना कधी उपलब्ध होईल हे माहित नाही.
