सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे हल्ले करणे कठीण नाही. हॅकर्स स्वतःला गुगल सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळख करून कॉल करतात आणि नंतर फॉलो-अप मेल देखील पाठवतात जेणेकरून यूझर्सला संशय येऊ नये. अशा मेलमध्ये अनेकदा 'Your account has been compromised' असे संदेश येतात. जेव्हा एखादा यूझर घाबरून लिंकवर क्लिक करतो तेव्हा हॅकर सिस्टमचा मागील दरवाजा उघडतो आणि पर्सनल डिटेल्स तपशील सहजपणे अॅक्सेस करतो.
advertisement
आता 'या' यूझर्ससाठीही आलंय WhatsApp चं नवं फीचर! चॅट स्क्रीनवर दिसतील नवे ऑप्शन
हे कॉल AI-पावर्ड व्हॉइस सिस्टम वापरतात. ज्यामुळे फसवणूक करणे आणखी सोपे होते. ही पद्धत व्हॉट्सअॅपवर दिसणाऱ्या एआय व्हॉइस फिशिंगसारखीच आहे, जिथे लोकांकडून पैसे किंवा पर्सनल डेटा लुबाडला जातो.
Gmailला लक्ष्य करण्याचे कारण स्पष्ट आहे. ते जगभरातील 2 अब्जाहून अधिक यूझर्सच्या डिजिटल अकाउंट्स आणि डेटाशी जोडलेले आहे. एकदा जीमेल हॅक झाल्यानंतर, इतर सर्व अकाउंट्समध्ये प्रवेश मिळतो.
सावधान! तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाही ना? या ट्रिकने लगेच कळेल
Googleने सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे सल्ला दिले आहेत:
- कोणत्याही संशयास्पद मेलमधील कोणत्याही लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका.
- नियमितपणे पासवर्ड बदलत रहा.
- अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी ऑथेंटिकेटर अॅप्स वापरा.
- शक्य असेल तेथे Passkeys वापरा.
सायबर सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे की, ही फक्त सुरुवात आहे. जीमेलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एआय हल्ले आधीच झाले आहेत आणि भविष्यात इतर प्लॅटफॉर्मवर देखील लक्ष्य केले जाईल.
