TRENDING:

प्रवाशांसाठी गुड न्यूज! हरवलेलं साहित्य शोधण्यात मदत करेल गूगलचं नवं फीचर

Last Updated:

गूगलने आपल्या फाइंड हब अॅपमध्ये नवं फीचर सादर केलं आहे. ज्याच्या मदतीने प्रवासी फ्लाइटमध्ये हरवलेलं बॅगेजचे रियल-टाइम लोकेशन एयरलाइन्ससह शेअर करु शकतील. हे फीचर सुरक्षित लिंकच्या माध्यमातून काम करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फ्लाइट दरम्यान साहित्य हरवणे प्रवाशांसाठी सर्वात प्रॉब्लम निर्माण करणारा अनुभव असतो. ही समस्या सोडवण्यासाठी गूगलने आपल्या फाइंड हब अ‍ॅपमध्ये एक नवी फीचर सादर केलं आहे.या फीचरच्या मदतीने प्रवासी आपलं हरवलेलं बॅगेजचं लोकेशन थेट एयरलाइन्ससोबत शेअर करु शकतील. ज्यामुळे साहित्य लवकर शोधण्यात मदत मिळेल.अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आधीच या नवीन फीचर्सचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये टर्किश एअरलाइन्सचा समावेश आहे, ज्याने लॉन्च पार्टनर म्हणून गुगलसोबत भागीदारी केली आहे.
गुगल अॅप
गुगल अॅप
advertisement

कसं काम करतं फाइंड हबचं बॅगेट ट्रेकिंग फीचर 

हे नवीन फीचर प्रवाशांना आपल्या बॅगची रियल-टाइम लोकेशन शेअर करण्याची सुविधा देते. पण बॅगेजमध्ये एखादं कम्पॅटिबल ट्रॅकर टॅग लागलेलं असावं. यामुळे एयरलाइन स्टाफ बॅकचे योग्य लोकेशन पाहून शकते आणि ते लवकर रिकव्हर करण्यात मदत मिळते.

TV रिमोटवर लाल, पिवळे, हिरवे बटणं का असतात? अनेकांना माहितीच नाही कारण

advertisement

  • लोकेशन शोधा आणि शेअर करा  : प्रवासी त्यांच्या अँड्रॉइड फोनवर फाइंड हब अॅप उघडू शकतात आणि त्यांना शोधायची असलेली वस्तू निवडू शकतात. 'आयटम लोकेशन शेअर करा' पर्यायावर टॅप केल्याने एक सुरक्षित लिंक तयार होईल.
  • एअरलाइनसोबत लिंक शेअर करा : ही लिंक प्रवाशांना एअरलाइनच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे बॅगेज क्लेम दरम्यान शेअर करता येईल. त्यानंतर एअरलाइन टीम लिंकद्वारे बॅगेचे अपडेट केलेले लोकेशन पाहू शकते.
  • advertisement

  • कधी बंद करु शकता शेयरिंग : लोकेशन शेयर करण्याचा पूर्ण कंट्रोल प्रवाशांजवळ असतो. ते अॅपच्या माध्यमातून कोणत्याही वेळी लोकेशन शेयरिंग बंद करु शकता.
  • गोपनीयता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाते : गुगलचे म्हणणे आहे की, हे फीचर प्रायव्हसी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. लोकेशन लिंक 7 दिवसांनंतर ऑटोमेटिक एक्सपायर होते. यूझर ते कधीही मॅन्युअली अक्षम देखील करू शकतात.
  • advertisement

पाण्यात लहान दगडही बुडतो, पण जड लोखंडी जहाज कसं तरंगत? कारण जाणून व्हाल चकीत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

सोबतच लोकेशन डेटा पूर्णपणे एन्क्रिप्टेड राहतो जेणेकरुन दुसरा कोणी व्यक्ती हे अॅक्सेस करु शकणार नाही. सामान मालकाजवळ जाता, लोकेशन शेयरिंग आपोआप बंद होते. हे नवीन फीचर प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. कारणयामुळे हरवलेले बॅगेज शोधण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि सोपी होईल.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
प्रवाशांसाठी गुड न्यूज! हरवलेलं साहित्य शोधण्यात मदत करेल गूगलचं नवं फीचर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल