सरकारी पेमेंट अॅप भीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामध्ये यूझर्सना 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, फक्त एकच अट आहे की तुम्ही किमान ₹20 चा व्यवहार केला पाहिजे. भीम अॅप त्याचा 9 वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि या निमित्ताने ही खास कॅशबॅक ऑफर लाँच केली आहे. यूझर्सना या रोमांचक ऑफरची माहिती देण्यासाठी अॅपने X वर पोस्ट केले आहे.
advertisement
AI च्या मदतीने नवा किडनॅपिंग स्कॅम सुरु! FBIचा इशारा, असा करा बचाव
BHIM अॅपचा वर्धापन दिन 30 डिसेंबर रोजी आहे आणि म्हणूनच यूझर्सना ही खास ऑफर मिळत आहे. भीम अॅप 30 डिसेंबर 2016 रोजी लाँच करण्यात आले. तेव्हापासून, त्याच्या प्रवासामुळे देशात डिजिटल पेमेंट सोपे आणि विश्वासार्ह झाले आहे.
वीज बिल पेमेंटवर कॅशबॅक
इतकेच नाही तर भीम अॅप बिल पेमेंटवर कॅशबॅक देखील देत आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, भीम अॅपवर चालणाऱ्या कॅशबॅक ऑफर अंतर्गत, वीज बिल भरणाऱ्या यूझर्सना अतिरिक्त बचत करण्याची संधी मिळत आहे. ही ऑफर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिल्ली सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या बीएसईएस राजधानी पॉवरने दिलीये. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, यूझर भीम अॅपद्वारे त्यांचे वीज बिल भरून इंस्टंट कॅशबॅक मिळवू शकतात. ही कॅशबॅक ऑफर या महिन्याच्या अखेरीस, 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध असेल. पेमेंट करताना, कॅशबॅक मिळवण्यासाठी चेकआउटवर बिलडेस्क ऑप्शन अवश्य निवडा.
तुम्ही वापरत असलेला फोन बनावट तर नाही? फक्त एका SMS ने सत्य येईल समोर
तुम्हाला किती कॅशबॅक मिळेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूझर्स महिन्यातून एकदाच या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कॅशबॅक मिळवण्यासाठी किमान ₹500 चे वीज बिल भरणे आवश्यक आहे. या ऑफर अंतर्गत, यूझर्सना जास्तीत जास्त ₹50 चा कॅशबॅक मिळू शकतो. जो थेट भीम अॅपशी लिंक केलेल्या त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाईल.
