हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, आपल्या त्वचेचा प्रकार ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्वचेचे तीन प्रकार असतात. तेलकट त्वचा, कोरडी त्वचा आणि सामान्य त्वचा. यापैकी आपला त्वचा प्रकार कोणता? हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. कारण आपल्याला जर त्वचा प्रकार माहीत नसेल तर त्यावर चुकीची ट्रीटमेंट होते. त्यामुळे त्वचेला आणखी हानी पोहोचते.
advertisement
Carrot Vs Radish : गाजर की मुळा? हिवाळ्यात आरोग्यासाठी कोण आहे 'सुपरफूड'? पाहा दोन्हीचे फायदे!
त्वचा तेलकट असेल तर ऑईल फ्री, ग्लिसरीन फ्री, पिंपल्स न येणारे मॉइश्चरायझर वापरावे. यामध्ये एलोवेरा असलेले, सिरॅमोसाईट असलेले मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. कोरडी त्वचा असल्यास हायल्यूरॉनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर वापरावे ते कोरड्या त्वचेसाठी सगळ्यात बेस्ट असतात. नॉर्मल त्वचा असल्यास एलोवेरा असलेले, सिरॅमोसाईट असलेले मॉइश्चरायझर त्याचबरोबर हायल्यूरॉनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर सुद्धा चालतात. दोन्ही प्रकारचे मॉइश्चरायझर नॉर्मल स्किन असलेली व्यक्ती वापरू शकते, अशी माहिती डॉ. टाकरखेडे यांनी दिली.
त्वचेची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्यात?
पुढे त्या सांगतात की, सोशल मीडियावरील कोणतेही व्हिडिओ, जाहिरात आणि ब्युटी टिप्स बघून आपल्या चेहऱ्यावर त्याचा वापर करू नये. कारण त्यातील कोणता घटक आपल्या त्वचेला सूट होतो आणि कोणता नाही. हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळं हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यांनतर ग्लिसरीन आणि गुलाब जल चेहऱ्यावर लावणे टाळावे. कारण सध्या मार्केटमध्ये येणारे ग्लिसरीन अतिशय खालच्या दर्जाचे असतात. त्यामुळे त्वचा काळी पडणे, लाल चट्टे येणे आणि बरेच त्रास होऊ शकतात. त्यामुळं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्वचेसाठी प्रॉडक्ट खरेदी करा. कुठलीही त्वचेची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ट्रीटमेंट करा, अशी माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.





