IPL 2026 साठी ऑक्शन लिस्ट तयार, 350 खेळाडूंवर शिक्कामोर्तब, पाहा 2 कोटींच्या सेटमध्ये कोण? क्विंटन डी कॉकची सरप्राइज एन्ट्री
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 Auction Full 350 Player List : एक कोटींच्या बेस प्राईजच्या यादीत 17 खेळाडू असून 42 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस ही 75 लाख रुपये निश्चित केली आहे.
TATA IPL 2026 Auction : गेल्या महिन्यात झालेल्या मिनी-लिलावापूर्वी, 10 फ्रँचायझींनी एकूण 71 खेळाडूंना रिलीज केले, ज्यात 32 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. अशातच यांचा लिलाव पार पडणार आहे. यावर्षी 2 कोटी रुपये सर्वाधिक बेस प्राईज ठेवण्यात आली आहे. यामध्ये कॅमेरुन ग्रीन, व्यंकटेश अय्यर, मथिशा पाथिराणा, डेव्हिड मिलर, रचिन रवींद्र आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.
1 कोटींच्या प्राईसमध्ये किती खेळाडू?
फक्त 9 खेळाडूंनी 1.5 कोटीच्या गटात नोंदणी केली आहे, तर फक्त चार खेळाडूंनी त्यांची बेसिक प्राईज 1.25 कोटी निश्चित केली आहे. 1 कोटींच्या बेस प्राईजच्या यादीत 17 खेळाडू असून 42 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस ही 75 लाख रुपये निश्चित केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडू आहेत.
advertisement
क्विंटन डी कॉकची सरप्राइज एन्ट्री
डी कॉकचे नाव सुरुवातीला लिलावाच्या यादीत नव्हतं, परंतु एका फ्रँचायझीने त्याची शिफारस केल्यानंतर त्याला लिलावात समाविष्ट करण्यात आलं. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावलं होतं. त्याचा फॉर्म लक्षात घेता त्याला कोणता संघ घेईल? यावर चर्चा सुरू झाली आहे. याच मुंबई इंडियन्सचा नाव आघाडीवर आहे.
advertisement
नव्याने सामील झालेल्या खेळाडूंची यादी
परदेशी खेळाडू - अरब गुल (अफगाणिस्तान), माइल्स हॅमंड (इंग्लंड), डॅन लाटेगन (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), कोनोर एडगवेअर (दक्षिण आफ्रिका), जॉर्ज लिंडे (दक्षिण आफ्रिका), बायंडा माजोला (दक्षिण आफ्रिका), ट्रेविन मॅथ्यू (श्रीलंका), बिनुरा फर्नांडो (श्रीलंका), कुसल परेरा (श्रीलंका), दुनिथ वेल्लागे (श्रीलंका), अकीम ऑगस्टे (वेस्ट इंडीज)
advertisement
भारतीय खेळाडू - सादेक हुसेन, विष्णू सोळंकी, साबीर खान, ब्रिजेश शर्मा, कनिष्क चौहान, आरोन जॉर्ज, जिक्कू ब्राइट, श्रीहरी नायर, माधव बजाज, श्रीवत्स आचार्य, यशराज पुंजा, साहिल पारख, रोशन वाघसरे, यश डिचोलकर, अयाज खान, धुर्मिल पुष्कर वालकर, नारद पारख, ना. अग्रवाल, ऋषभ चौहान, सागर सोलंकी, इजाज सावरिया, अमन शेखावत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 साठी ऑक्शन लिस्ट तयार, 350 खेळाडूंवर शिक्कामोर्तब, पाहा 2 कोटींच्या सेटमध्ये कोण? क्विंटन डी कॉकची सरप्राइज एन्ट्री


