ब्लू लाइट हा त्वचेचा 'शत्रू' आहे
संशोधनात असे आढळून आले आहे की, स्मार्टफोनसह इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या स्क्रीनमधून निघणारा ब्लू लाइट त्वचेच्या पेशींमध्ये बदल घडवून आणू शकतो. यामुळे पेशी आकुंचन पावण्याचा आणि शेवटी पेशी नष्ट होण्याचा धोका असतो. यामुळे त्वचेची चमक कमी होते आणि ती वेळेपूर्वी जुनी दिसू लागते.
iPhone 17 सीरीजची लॉन्च डेट झाली कंफर्म! पाहा भारतात कधी होतोय लॉन्च
advertisement
त्वचेला होतात नुकसान
तज्ञांचे म्हणणे आहे की, ब्लू लाइट त्वचेत खोलवर प्रवेश करतो. ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. निळ्या प्रकाशामुळे टॅनिंग, हायपरपिग्मेंटेशन, फ्रिकल्स आणि इतर त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्वचेवर जितका जास्त निळा प्रकाश पडेल तितके जास्त नुकसान होईल. स्मार्टफोन किंवा इतर गॅझेट्सच्या निळ्या प्रकाशाच्या सतत संपर्कात राहिल्याने त्वचेवर सूज येण्याची भीती देखील असते.
कोणत्या कंपनीचा फोन विकल्यावर दुकानदाराला होते सर्वाधिक कमाई? सत्य जाणून व्हाल हैराण
कसे टाळायचे?
स्मार्टफोन आणि इतर स्क्रीन गॅझेट्सचा वापर कमी करून हे नुकसान टाळता येते. तरीही, काही लोकांना त्यांच्या कामामुळे सतत स्क्रीनसमोर बसावे लागते. असे लोक व्हिटॅमिन सी आणि ईची मदत घेऊ शकतात. जे त्वचा तरुण ठेवतात. याशिवाय, तज्ञ स्क्रीनसमोर बसण्यापूर्वी स्किनकेअर उत्पादनांची मदत घेण्याचा सल्ला देतात, जेणेकरून त्वचेवर ब्लू लाइटचा परिणाम कमीत कमी होईल.
