वय कसं कळेल?
चॅटजीपी म्हणते की, ते एक स्पेशल ऐज प्रेडिक्शन मॉडल वाबरेल. जे बिहेवियरल आणि अकाउंट-लेव्हल सिग्नलच्या कॉम्बिनेशनच्या आधारावर यूझरच्या वयाचा अंदाज लावेल. यामध्ये कंपनी पाहिल की, एखादं अकाउंट किती जास्त काळ चालत आहे. त्याचा अॅक्टिव्हिटी टाइम काय आहे, अकाउंटचा युजेज पॅटर्न काय आहे आणि साइन-अपच्या वेळी यूझरने आपले वय किती सांगितले होते. कंपनी म्हणते की, हे वेगवेगळ्या इंडीकेटर्सचा वापर करुन जाणून घेऊ शकते. एखादं अकाउंट मायनरचं असेल किंवा त्याचं वय 18 वर्षांच्या वय झालं असेल. रोल आउटनंतर यूझर फीडबॅकच्या आधारावर हे मॉडल रिफाइन होत राहील.
advertisement
Google Mapsचं लपलेलं जुगाड जाणून घेतल्यास होणार नाही लेट! ट्रॅफिक विसरुन जाल
वयाचा अचूक अंदाज लावला नसेल तर काय?
ओपनएआय म्हणते की, जर मॉडेल यूझरचे वय अचूकपणे ठरवू शकत नसेल, तर ते सुरक्षा सेटिंग अॅक्टिव्ह करेल. एखाद्या यूझरला असे वाटत असेल की सिस्टमने त्यांना चुकून 18 वर्षाखालील म्हणून ओळखले आहे, तर ते सेल्फी वापरून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकतात.
इयरबड्सनेही होऊ शकते तुमची हेरगिरी! ही गोष्ट जाणून घेतल्यास व्हाल हैराण
किशोरवयीन यूझर्सना असा कंटेंट दिसणार नाही
त्याचप्रमाणे, एखादा यूझर 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर हा चॅटबॉट संवेदनशील आणि संभाव्य हानिकारक सामग्रीचा संपर्क कमी करेल. कंपनीने असे म्हटले आहे की ग्राफिक हिंसाचार, संभाव्य हानिकारक व्हायरल आव्हाने, लैंगिक, रोमँटिक किंवा हिंसक भूमिका-खेळ, अत्यंत सौंदर्य मानके, अस्वास्थ्यकर आहार आणि बॉडी शेमिंग असलेला कंटेंट 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूझर्ससाठी रेस्ट्रिक्ट असेल.
