इयरबड्सनेही होऊ शकते तुमची हेरगिरी! ही गोष्ट जाणून घेतल्यास व्हाल हैराण 

Last Updated:

तुमचे इयरबड्स आणि दुसऱ्या ऑडिओ अ‍ॅक्सेसरीजने तुमची जासुसी केली जाऊ शकते. खरंतर गूगलच्या एका प्रोटोकॉलमध्ये कमतरता आढळल्या आहेत. ज्याचा फायदा घेऊन हॅक तुमचे ब्लूटूथ डिव्हाइस हायजॅक करु शकतात.

ईयरबड्स न्यूज
ईयरबड्स न्यूज
मुंबई : तुम्ही कधी विचार केला नसेल, पण इयरबड्सनेही तुमची जासुसी केली जाऊ शकते. सिक्योरिटी रिसर्चरने अशा काही कमतरता शोधल्या आहेत, ज्याच्या मदतीने हॅकर्स सोनी, मार्शल, शाओमी, नथिंग, लॉजिटेक आणि गूगल सारख्या मोठ्या कंपन्यांचे ऑडियो डिव्हाइस आणि अॅक्सेसरीजचा कंट्रोल आपल्या हातात घेऊ शकता. अनेक प्रकरणांमध्ये या कमतरतांमुळे तुमचे लोकेशनही ट्रॅक केले जाऊ शकते. जाणून घेऊया पूर्ण डिटेल्स...
काय दोष आहे?
गुगलने एका टॅपने ब्लूटूथ डिव्हाइसेसना अँड्रॉइड आणि क्रोमओएस प्रोडक्ट्सशी जोडण्यासाठी फास्ट पेअर नावाचा वायरलेस प्रोटोकॉल विकसित केला आहे. या प्रोटोकॉलमध्ये ही त्रुटी आढळून आली आहे. आयफोन वापरकर्त्यांनाही धोका आहे. अशा त्रुटींचा फायदा घेणाऱ्या हल्ल्यांना व्हिस्पर पेअर असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्यात, हॅकर वापरकर्त्यापासून 50 फूट अंतरावर असला तरीही, ते त्यांचे डिव्हाइस लक्ष्यित ऑडिओ डिव्हाइसशी जोडू शकतात आणि ते हायजॅक करू शकतात.
advertisement
हॅकर्सना हे नियंत्रण त्यांच्या हातात असेल
एकदा हॅकर्स एखाद्या लक्ष्यित डिव्हाइसशी कनेक्ट होण्यास यशस्वी झाले की, ते तुमचे फोन संभाषण ऐकू शकतात आणि त्यांच्या आवडीचा ऑडिओ प्ले करू शकतात. शिवाय, ते तुमच्या डिव्हाइसचा मायक्रोफोन देखील चालू करू शकतात आणि तुमच्या सभोवतालचे संभाषण ऐकू शकतात. अनेक गुगल आणि सोनी डिव्हाइसेसमध्ये फाइंड हब नावाचे जिओलोकेशन ट्रॅकिंग फीचर समाविष्ट आहे. हे हॅकर्सना त्यांच्या लक्ष्याचे रिअल-टाइम लोकेशन पाहण्याची परवानगी देते.
advertisement
गुगलला दिली गेली माहिती 
सिक्योरिटी रिसर्चरच्या खुलाशानंतर गूगलने फास्ट पेयरमध्ये कमतरता असल्याची गोष्ट स्वीकारली आहे. मात्र लॅब बाहेर याच्या दुरुपयोगाचं कोणतंही प्रकरण समोर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कंपनीने म्हटले की, ते या प्रकरणावर नजर ठेवून आहेत. फास्ट पेयर आणि फाइंड हबची सिक्योरिटी वाढवण्यावर काम करत आहेत. गूगलने ऑडियो अॅक्सेसरीजसाठी सिक्योरिटी अपडेटही रिलीज केला आहे. जेणेकरुन व्हिसपरपेयरसारख्या धोक्यांपासून यूझर्सचा बचाव केला जाऊ शकेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
इयरबड्सनेही होऊ शकते तुमची हेरगिरी! ही गोष्ट जाणून घेतल्यास व्हाल हैराण 
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement