मुंबईतील ठाकरेंच्या एकमेव फुटलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के कोण आहेत? शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा

Last Updated:

Who is Dr Sarita Mhaske: डॉ. सरिता म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या ६४ वर आली आहे.

उद्धव ठाकरे-मुंबई महापालिका निवडणूक
उद्धव ठाकरे-मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई : कोणत्याच राजकीय पक्षाला मुंबईत स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने महापौरपदी कोण बसणार? याची जोरदार चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के सध्या संपर्कक्षेत्राच्या (नॉट रिचेबल) बाहेर आहेत. शिवसेना पक्षाने नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बोलाविलेल्या बैठकीलाही डॉ. सरिता म्हस्के यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मुंबईत पहिला धक्का बसल्याचे मानण्यात येते आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक गट नोंदणी करण्यासाठी नवी मुंबईला रवाना झाले. मात्र नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांना संपर्क करूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. मात्र डॉ. सरिता म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या ६४ वर आली आहे.
advertisement

डॉ. सरिता म्हस्के कोण आहेत?

डॉ. सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक १५७ मधून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यांनी भाजपच्या आशा तायडे यांना पराभवाची धूळ चारली. चांदिवली परिसरातील प्रभाग क्रमांक १५७ मधल्या या लढतीकडे मुंबईकरांचे लक्ष्य लागले होते. जवळपास १८०० मतांनी डॉ. सरिता म्हस्के यांनी आशा तायडे यांना पराभूत केले. सरिता म्हस्के या पेशाने डॉक्टर असून होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कोरोना काळात त्यांनी खूप चांगले काम केले. आपल्या कामांनी त्या जनतेत लोकप्रिय झाल्या.
advertisement
स्थानिकांच्या प्रश्नांवर त्या आक्रमक होऊन व्यवस्थेशी दोन हात करतात. डॉ. सरिता म्हस्के यांनी २०१७ महापालिका निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे त्यांनी प्रभागात चांगले काम केले. आत्ताही महापालिका निवडणुकीत त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैधरित्या फ्लेक्स लावणार नाही, लावू देणार नाही, असे प्रचारकाळात सांगितले होते.
advertisement

सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेनेकडून सुरू

आजच्या सेना भवनातील बैठकीला डॉ.सरिता म्हस्के गैरहजर राहिल्यानंतर आणि संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा संपर्क होत नसल्याच्या कारणातून शिवसेना पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेनेकडून सुरू असल्याचे कळते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईतील ठाकरेंच्या एकमेव फुटलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के कोण आहेत? शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement