सध्याच्या काळात लोक आपले आश्यक डॉक्यूमेंट डिजिटल रुपात ठेवणं पसंत करतात. हीच गरज लक्षात घेता DigiLocker ने ही सुविधा सुरू केलीये. ज्यामुळे यूझर्सला वारंवार वीज बिलासाठी वेबसाइट किंवा ऑफिसवर जावं लागू नये. आता सर्व डॉक्यूमेंट्स एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवले जाऊ शकतील.
हे फीचर कसं काम करतं?
या फीचरचा वापर करण्यासाठी यूझर्सला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरने DigiLocker मध्ये लॉगिन करावं लागेल. यानंतर 6 अंकांचा सिक्योरिटी पीन टाकून डॅशबोर्डवर जाता येईल.
advertisement
फूल स्पीड करुनही फॅन हवा देत नाहीये? फक्त 60 रुपयांत होईल काम, सुपरफास्ट फिरेल पंखा
डॉक्यूमेंट सेक्शनमध्ये जाऊन ‘इलेक्ट्रिसिटी बिल’ केल्यावर वेगवेगळ्या राज्यांचे वीज बिल प्रदातांची लिस्ट दाखवली जाईल. जसं की, CESC, TPDDL आणि JUSCO.
यानंतर यूझर्सला आपला कंज्यूमर नंबर आणि मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. माहिती सबमिट करताच DigiLocker थेट संबंधित कंपनीच्या डेटाबेसवरुन बिल काढते आणि अॅपमध्ये दाखवते.
याचे फायदे काय?
वीज बिल ‘Verified’ टॅगसह मिळतं.
कोणत्याही वेळी अॅक्सेस केलं जाऊ शकतं.
डाउनलोड आणि शेअर करण्याची सुविधा.
दुसरे डॉक्यूमेंट्स म्हणजे Aadhaar सह स्टोर करण्याची सुविधा.
फ्रिज खरेदी करताय? आधी 'हे' वाचा, नाही तर डबल येईल वीज बील
सुरक्षित आणि सोपे
या फीचरमध्ये यूझर्सला मॅन्युअली डॉक्यूमेंट अपलोड करण्याची गरज नसते. सर्व रेकॉर्ड थेट अधिकृत सोर्सने येतात. ज्यामुळे त्याची व्हॅलिडिटी टिकून राहते. सोबतच सिक्योर लॉगइन आणि पीन सिस्टम डेटाला सुरक्षित ठेवते.
हे फीचर खास का?
हे फीचर तुमचा वेळ वाचवते. यासोबतच पेपरलेस सिस्टमला प्रोत्साहन देते. आता यूझर्स आपलं वीज बिल सहज मॅनेज करू शकतात आणि गरज पडल्यावर वापरू शकतात.
