Redmi 15 5G ची नवीन किंमत- कंपनीने सांगितले की सेलमध्ये Redmi 15 5G ची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होईल. त्याची लाँच किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली होती. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांचा पूर्ण फायदा मिळेल. हा फोन Amazon आणि Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
WhatsApp यूझर्ससाठी मोठी गुड न्यूज! AI फीचरने आणखी मजेदार होईल Video Call
advertisement
याशिवाय, Redmi Note 14 Pro 5G सेलमध्ये 20,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर त्याची सध्याची किंमत 24,999 रुपये आहे. त्याच वेळी, Redmi Note 14 Pro + 5G ची किंमत 30,999 रुपयांवरून 24,999 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच, ग्राहकांना या दोन्ही स्मार्टफोनवर 4,000 ते 6,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
लवकरच सुरु होणार Amazon Great Indian Festival सेल! या प्रॉडक्टवर मिळतेय धमाकेदार ऑफर
Redmi 14c आणि Buds 5C ऑफर - बजेट सेगमेंटसाठी सादर केलेला Redmi 14c आता 8,999 रुपयांना उपलब्ध असेल. तर त्याची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. दुसरीकडे, Redmi Buds 5Cची किंमत 1,999 रुपयांवरून 1,799 रुपयांवर आली आहे.
कंपनी सेलमध्ये स्वस्त किमतीत आपली अधिक प्रोडक्ट्स उपलब्ध करून देईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता हळूहळू रेडमी अधिक ऑफर डील उघड करेल. हा सेल कधी सुरू होईल हे पाहणे बाकी आहे.