TRENDING:

Smartphone विषयीच्या 'या' अफवांवर कधीच ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल नुकसान

Last Updated:

स्मार्टफोनबद्दल अनेक अफवा आणि समज लोकांमध्ये पसरतात. आज आम्ही तुम्हाला त्यामागील सत्याची जाणीव करून देणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियावर आणि दैनंदिन जीवनात स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्सबद्दल अनेक प्रकारच्या अफवा सुरू असतात. बरेच लोक असं मानतात की फ्लाइट मोडमध्ये फोन जलद चार्ज होतो. तर काहींचा असा विश्वास आहे की फोनची खराब झालेली बॅटरी फ्रीजरमध्ये ठेवल्याने ती दुरुस्त होते. तुमच्यापैकी अनेकांनी अशा अफवा ऐकल्या असतील किंवा वापरून पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशा काही अफवा आणि त्यामागील सत्य सांगणार आहोत.
स्मार्टफोन टिप्स
स्मार्टफोन टिप्स
advertisement

एअरप्लेन मोडमध्ये बॅटरी जलद चार्ज होते का?

हे खरे नाही. फोन एअरप्लेन मोडमध्ये सिग्नल शोधणे थांबवतो. तरी त्याचा बॅटरीच्या चार्जिंग स्पीडवर फारसा परिणाम होत नाही. फोन फास्ट आणि सुरक्षितपणे चार्ज करण्यासाठी सुसंगत चार्जर आणि केबल असणे आवश्यक आहे. हो, फोन बंद केल्याने, त्यात चालणाऱ्या बॅकग्राउंड प्रोसेस थांबतात आणि तो थोडा जलद चार्ज होऊ शकतो.

advertisement

OTP शेअर न करताही बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं! अशी घ्या काळजी

बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद केल्याने बॅटरीची बचत होते का?

हे पूर्णपणे चुकीचे आहे, खरं तर उलट घडते. तुम्ही फोनमधील बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद केले नाहीत तर बॅटरी जास्त काळ टिकेल. अ‍ॅप्स वारंवार बंद केल्याने आणि पुन्हा उघडल्याने जास्त बॅटरी खर्च होते. अ‍ॅप बंद केल्याने आणि उघडल्याने ते रॅममध्ये रीलोड होते, ज्यामुळे जास्त बॅटरी खर्च होते.

advertisement

ओले डिव्हाइसेस तांदळात ठेवल्याने ते ठीक होते का?

बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, ओले स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाइसेस तांदळात ठेवल्याने त्यांचा ओलावा निघून जाईल. खरंतर, तांदूळ हा एक मजबूत ड्रायरिंग एजंट नाही. तो हळूहळू फक्त पृष्ठभागावरील ओलावा शोषून घेतो, परंतु ते कण सोडतो जे चार्जिंग किंवा इतर पोर्टना नुकसान पोहोचवू शकतात.

advertisement

YouTubeवरुन कोट्यवधी रुपये कसे कमवायचे? चॅनेल मोनेटाइज करण्यासाठी फॉलो करा या ट्रिक

फ्रीजरमध्ये खराब झालेली बॅटरी दुरुस्त होते का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

बॅटरी हळूहळू चार्ज होऊ लागली किंवा जास्त गरम होऊ लागली तर काही लोक ती फ्रीजरमध्ये ठेवतात. त्यांना वाटते की, असे केल्याने बॅटरी दुरुस्त होऊ शकते. ही पूर्णपणे अफवा आहे. आजकाल बहुतेक फोन लिथियम-आयन बॅटरीसह येतात आणि या बॅटरी खूप थंड किंवा खूप गरम तापमानासाठी डिझाइन केलेल्या नसतात. त्या फ्रीजरमध्ये ठेवल्याने त्यांच्या रासायनिक अभिक्रिया मंदावतात, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Smartphone विषयीच्या 'या' अफवांवर कधीच ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल