असे मेसेज लोकांकडून येत आहेत
रिपोर्टनुसार, लोकांना असे मेसेज येत आहेत की, त्यांनी रेड लाइट जंप केले आहे. ज्यामुळे ₹1,000 दंड भरावा लागतो. मेसेजमध्ये एक बनावट चलन क्रमांक आणि एक लिंक समाविष्ट आहे. ज्यावर क्लिक केल्यावर, अॅप डाउनलोड करण्यास किंवा डिटेल्स तपासण्यास सांगितले जात आहे. ही लिंक मलेशियस आहे आणि त्यावर क्लिक केल्याने यूझर्सना फिशिंग किंवा मालवेअर साइटवर रिडायरेक्ट केले जाते. जिथे पर्सनल माहिती चोरीला जाऊ शकते आणि त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. या मेसेजमध्ये कायदेशीर कारवाईची धमकी देखील आहे.
advertisement
Air Conditioner : हिवाळ्यात हिटरची गरज नाही, ACनेच घर करा उबदार, कसं? 'या' स्टेप्स करा फॉलो
mParivahan अॅप WhatsApp द्वारे चलन पाठवत नाही
तुम्हाला अशा ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनांसाठी चालान संदेश मिळाले तर सावधगिरी बाळगा आणि लिंकवर क्लिक करू नका. कृपया लक्षात ठेवा की mParivahan अॅप किंवा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कधीही WhatsApp द्वारे चालान मेसेज पाठवत नाही. ई-चलनांची अधिकृत माहिती फक्त वाहतूक पोर्टल किंवा राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि माहिती SMS द्वारे दिली जाते.
मोबाईल डेटा लवकर संपतो का? लगेच बदला स्मार्टफोनमधील या सेटिंग्स
अशा घोटाळ्यांपासून कसे टाळायचे?
- अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्तींकडून आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका.
- तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला चालान मिळाले आहे, तर वाहतूक वेबसाइट किंवा अॅपद्वारे ते सत्यापित करा.
- कोणी तुम्हाला WhatsApp वर असे मेसेज पाठवत असेल, तर त्यांना रिपोर्ट करा आणि त्यांना ब्लॉक करा.
- तुमची संवेदनशील माहिती तुम्हाला ओळखत नसलेल्या किंवा संशयित व्यक्तीसोबत कोणालाही शेअर करू नका.
