Air Conditioner : हिवाळ्यात हिटरची गरज नाही, ACनेच घर करा उबदार, कसं? 'या' स्टेप्स करा फॉलो
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एकाच मशीनमधून तुम्ही उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उबदारपणा दोन्ही मिळवू शकता. ज्याबद्दल अनेकांना माहितच नाही.
मुंबई : हिवाळा आला की थंडीपासून बचावासाठी लोक सर्वात आधी हिटरकडे धाव घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमचं एअर कंडिशनरच तुमचं ‘हिटर’ बनू शकतं? होय, आधुनिक एसी केवळ थंडावा देण्यासाठी नसतात, तर ते थंडीतही घर गरम ठेवण्याचं काम करू शकतात. म्हणजेच, एकाच मशीनमधून तुम्ही उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उबदारपणा दोन्ही मिळवू शकता. ज्याबद्दल अनेकांना माहितच नाही.
हे शक्य होतं "हीट मोड" किंवा "रिव्हर्स सायकल" फंक्शनमुळे, जे आता बहुतेक इन्व्हर्टर आणि स्प्लिट एसींमध्ये उपलब्ध आहे. पण हे करायचं कसं आणि त्यासाठी कोणती सेटिंग लागते? चला पाहू
एसीला ‘हीट मोड’मध्ये कसं चालू करायचं?
एसीला हिटरप्रमाणे वापरणं अगदी सोपं आहे. रिमोटवरील Mode बटण दाबत राहा जोपर्यंत 'सूर्याचं चिन्ह' किंवा 'HEAT' असा पर्याय दिसत नाही. त्यानंतर तापमान 24°C ते 26°C दरम्यान ठेवा हे सर्वात आरामदायी आणि ऊर्जा-बचतीसाठी योग्य मानलं जातं.
advertisement
सुरुवातीला थंड हवा येत असल्यास घाबरू नका कारण एसीला कंप्रेसर रिव्हर्स होण्यासाठी साधारण 1–2 मिनिटं लागतात. त्यानंतरच गरम हवा बाहेर येऊ लागते. चांगला परिणाम मिळवण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा, Swing Mode सुरू करा आणि तापमान 27°C पेक्षा जास्त ठेवू नका, कारण त्यामुळे वीज जास्त खर्च होते पण उष्णता फार वाढत नाही.
advertisement
सामान्य इलेक्ट्रिक हिटर उष्णता तयार करतो, तर एसी हिटर (Heat Pump) बाहेरील हवेतली उष्णता आत खेचतो म्हणजेच ती तयार करत नाही, फक्त ट्रान्सफर करतो. यामुळे इन्व्हर्टर एसी पारंपरिक हिटरपेक्षा 30-40% जास्त ऊर्जा कार्यक्षम ठरतो. वीजबिलात बचत होते आणि खोलीत उबदार वातावरण कायम राहतं.
तथापि, याची कार्यक्षमता खोलीच्या इन्सुलेशनवर आणि आकारावर अवलंबून असते. मोठ्या किंवा हवाबंद नसलेल्या जागेत वीज जास्त खर्च होऊ शकते. त्यामुळे तुमचा एसी हिटर बंद खोलीत, योग्य तापमानात वापरा आणि या हिवाळ्यात गरम वातावरणाचा आनंद घ्या तेही कमी खर्चात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 9:41 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Air Conditioner : हिवाळ्यात हिटरची गरज नाही, ACनेच घर करा उबदार, कसं? 'या' स्टेप्स करा फॉलो


