TRENDING:

ford vs ferrari सिनेमा ज्यांच्यावर आहे आधारलेला, त्या केन माइल्स यांचा मृत्यू कसा झाला?

Last Updated:

ऑटोमोटिव्ह रेसिंगच्या इतिहासातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आजही आदर केला जातो. त्यांना अमेरिकेच्या मोटरस्पोर्ट्स हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालेलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुम्हाला अशा काही व्यक्ती माहिती असतील ज्यांचा आवडत्या गोष्टी करताना मृत्यू झाला. उदाहरण द्यायचं झालं तर दिवंगत गायक केके (कृष्णकुमार कुन्नथ) यांचं देता येईल. एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान हार्ट अॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला. अशाच व्यक्तींमध्ये केनेथ हेन्री जार्विस माइल्स (केन माइल्स) या ब्रिटिश स्पोर्ट्स कार रेसिंग इंजिनीअर आणि ड्रायव्हरचाही समावेश होतो. यूएसमधील मोटारस्पोर्ट कारकीर्दीसाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होते. ऑटोमोटिव्ह रेसिंग उद्योगात त्यांनी उल्लेखनीय वारसा निर्माण केला.
(केन्स माइन्स)
(केन्स माइन्स)
advertisement

 कोण होते केन माइल्स?

केनेथ हेन्री जार्विस माइल्स यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1918 रोजी ब्रिटनमधील वारविकशायर येथील सटन कोल्डफिल्ड येथे झाला होता. माइल्स यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात तरुण वयातच केली. 15 व्या वर्षी शाळा सोडून वोल्सेली मोटर्समध्ये ते अप्रेंटिस बनले. त्यांना वाहन बांधणीची आवड होती. त्यासाठी त्यांनी अमेरिकेला पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता. मोटरस्पोर्ट कारकीर्दीला सुरुवात करण्यापूर्वी माइल्स यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात सेवा बजावली. माइल्स यांनी सुरुवातीला प्रादेशिक सैन्यात ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं. 1 ऑक्टोबर, 1942 रोजी, ते रॉयल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीअर्सच्या (REME) संस्थापक सदस्यांपैकी एक बनले. त्यांनी आरईएमई प्रशिक्षण आस्थापनेमध्ये आर्मामेंट आर्टिफिसर म्हणून प्रशिक्षण घेतलं. टँक कमांडर म्हणून काम करताना त्यांची अभियांत्रिकीची आवड आणखी वाढली. 1 एप्रिल 1946 रोजी त्यांना राखीव दलात पाठवण्यात आलं. युद्धादरम्यानच्या अनुभवांमुळे माइल्सच्या मोटरस्पोर्ट्समधील भविष्याचा पाया घातला गेला, 'फ्रेशर्स लाईव्ह'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

advertisement

अकाली निधनापूर्वी माइल्सनं रेसिंग जगतात लक्षणीय प्रभाव पाडला होता. फोर्ड GT40 कार्यक्रमाच्या विकासात आणि यशामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषत: 1966 मधील प्रतिष्ठित '24 अवर्स ऑफ ले मॅन्स रेस' त्यांनी चांगलीच गाजवली. माइल्स यांनी सह-चालक डेनी हुल्मे यांच्यासह 24 अवर्स ऑफ डेटोनामध्ये विजय मिळवला होता.

माइल्सशी संबंधित 'फोर्ड फोटो फिनिश' घटना काय होती?

advertisement

1966 मध्ये '24 अवर्स ऑफ ले मॅन्स रेस'दरम्यान 'फोर्ड फोटो फिनिश' म्हणून ओळखली जाणारी एक प्रसिद्ध घटना घडली होती. असं मानलं जातं की, केन माइल्स यांनी अंतिम रेषेजवळ जाणूनबुजून वेग कमी केला होता. ही शर्यत फोर्ड GT40s मधील एक निकराची लढाई होती आणि टीमला तिन्ही गाड्यांसह एकत्रितपणे फिनिश लाईन ओलांडायची होती. शर्यतीचा समारोप जवळ आला तेव्हा केन माइल्स फोर्ड GT40 मधील शर्यतीत आघाडीवर होते आणि ब्रूस मॅक्लारेन दुसर्‍या फोर्ड GT40 सह मागे होता. टीमला त्यांच्या कारचा एक परिपूर्ण फोटो फिनिश हवा होता. म्हणून त्यांनी मॅक्लारेनला जवळ येऊ देण्यासाठी माइल्सला वेग कमी करण्याची सूचना दिली होती. सिग्नलच्या गैरसमजामुळे माइल्सचा वेग खूपच कमी झाला आणि मॅक्लारेनला केवळ काही फुटांनी विजय मिळवता आला.

advertisement

केन माइल्सचा शेवट कसा झाला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

कॅलिफोर्नियामधील रिव्हरसाइड इंटरनॅशनल रेसवे येथे फोर्ड जे-कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रोटोटाइप कारची चाचणी करताना केन माइल्सचा 17 ऑगस्ट 1966 रोजी दुःखद अंत झाला. चाचणी सत्रादरम्यान माइल्स जे-कारच्या चाकाच्या मागे होते. त्याचवेळी एक अनपेक्षित आणि गंभीर यांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे J-कार उलटली. याच घटनेत केन माइल्सला आपला जीव गमवावा लागला. अकाली निधनानंतरही केन माइल्स यांनी मोटरस्पोर्ट्स क्षेत्रावर, विशेषत: रेसिंग आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात कायमस्वरूपी प्रभाव टाकला. ऑटोमोटिव्ह रेसिंगच्या इतिहासातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आजही आदर केला जातो. त्यांना अमेरिकेच्या मोटरस्पोर्ट्स हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालेलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
ford vs ferrari सिनेमा ज्यांच्यावर आहे आधारलेला, त्या केन माइल्स यांचा मृत्यू कसा झाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल