AI फीचर्समुळे तुमचा फोन पूर्वीपेक्षा जास्त स्मार्ट होत आहे, पण बदलत्या तंत्रज्ञानासोबत गोपनीयतेशी संबंधित धोके दुर्लक्षित करता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वी Google Gemini मध्ये एक अपडेट आलं आहे, ज्यानंतर हे AI टूल आता तुमचे मेसेजेस, फोन कॉल्स आणि WhatsApp चॅट्सही सहजपणे वाचू शकतं. गेल्या आठवड्यात Google ने काही Android वापरकर्त्यांना एक ईमेल पाठवला होता. यात त्यांनी सांगितलं होतं की 7 जुलैपासून Google, Gemini तुमच्या फोनवरील काही ॲप्ससोबत ज्या प्रकारे संवाद साधतं, त्यात बदल करत आहे.
advertisement
चॅट्स 72 तासांसाठी अकाउंटमध्ये सेव्ह
या ईमेलमध्ये Google ने म्हटलं होतं की लवकरच Gemini तुम्हाला तुमचा फोन, मेसेजेस आणि WhatsApp वापरण्यात मदत करू शकेल, जरी तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील Gemini ॲप्सची ॲक्टिव्हिटी बंद केली असेल तरी. Google चं म्हणणं आहे की Gemini ॲप्स तुम्हाला Google AI चा थेट ॲक्सेस देतात आणि तुमच्या चॅट्स 72 तासांसाठी तुमच्या अकाउंटमध्ये सेव्ह राहतात. याचा अर्थ, तुमची इच्छा असो वा नसो, तुमच्या WhatsApp चॅट्ससारखा खासगी डेटा काही तासांसाठी कंपनीकडे तात्पुरता स्टोअर केला जाईल.
इथे मिळेल फीचर बंद करण्याचा ऑप्शन
हे अपडेट Gemini ला अधिक उपयुक्त बनवतं, कारण आता हा AI चॅटबॉट तुमचे WhatsApp मेसेजेस वाचून तुमच्या वतीने उत्तरं देऊ शकतो. पण काही वापरकर्त्यांसाठी ही डोकेदुखी ठरू शकते, ज्यांना Gemini ला त्यांच्या खासगी चॅट्सचा ॲक्सेस नको आहे. जर तुम्हाला कनेक्टेड असलेल्या सर्व ॲप्ससाठी Gemini ॲक्टिव्हिटी बंद करायची असेल, तर तुमच्या Android फोनवर Gemini ओपन करा, त्यानंतर प्रोफाइल पिक्चर आयकॉनवर टॅप करा आणि नंतर Gemini Apps Activity या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला हे फीचर बंद करण्याचा ऑप्शन मिळेल.
अशी करा सेटिंग
हे फीचर बंद केल्यानंतरही Gemini तुमच्या ॲप्सची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी तुमचा डेटा 72 तासांसाठी स्टोअर करेल. जर तुम्हाला विशिष्ट ॲपचा डेटा Gemini ला ॲक्सेस करण्यापासून थांबवायचा असेल, तर Gemini ॲपमध्ये तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि Apps वर क्लिक करा. इथे तुम्ही निवडू शकता की कोणत्या ॲप्सला Gemini ने कनेक्ट करायचं आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या फोनवरील Gemini ॲप बंद करू शकता, जेणेकरून हा एआय चॅटबॉट तुमच्या डिव्हाइसवरील कोणतीही ॲक्टिव्हिटी ट्रॅक करू शकणार नाही.
हे ही वाचा : कमी खर्चात मिळेल जबरदस्त मायलेज! 60 हजारांपासून सुरु होतात या पैसा वसुल बाईक्स
हे ही वाचा : Car ची एअरबॅग घेऊ शकते तुमचा जीव! अजिबात करु नका या चुका
