Speed Dial फीचर कुठे मिळेल?
स्पीड डायल फीचर YouTube म्यूझिक ॲपच्या होम सेक्शनमध्ये आहे. यामध्ये युजरने नुकतीच ऐकलेली टॉप 9 गाणी दिसत आहेत. यूझर्स स्वाइप करून उर्वरित 9 गाणी देखील पाहू शकतात. ही गाणी यूझर्सद्वारे पूर्वी ऐकलेली गाणी आणि फेव्हरेट मार्क केलेल्या गाण्यांच्या आधारे निवडली जातात.
Jio ने वाढवलं BSNL चं टेन्शन! 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात लॉन्च केले 2 रिचार्ज प्लॅन
advertisement
यूझर्ससाठी सुविधा
Listen Again फीचरमध्ये, गाणी लिस्ट किंवा कार्ड स्वरूपात दाखवली गेली, ज्यामुळे त्यांना नेव्हिगेट करणे कठीण झाले होते. नवीन फीचरमध्ये हे सोपे करण्यात आले आहे. नवीन फीचरमध्ये, सर्व गाणी एकाच स्क्रीनवर दिसतात, ज्यामुळे त्याद्वारे नेव्हिगेट करणे सोपे होते. सध्या यूट्यूब म्युझिक ॲपच्या अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनवर स्पीड डायल फीचर उपलब्ध आहे. वेब व्हर्जनवर हे फिचर कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
ट्रॅफिक चालानच्या नावावर होतंय मोठा स्कॅम! तुम्हीही करताय का ही चूक?
इंटरफेसमध्ये बदल
यूट्यूब म्युझिक ॲपमध्ये काही यूजर इंटरफेस अपडेट्स देखील करण्यात आले आहेत. थ्री-डॉट मेनू ऑप्शनचा आकार वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे मोठ्या स्क्रीनवर वापरणे सोपे झाले आहे. काही इतर UI घटकांमध्ये देखील किरकोळ बदल करण्यात आले आहेत. या अपडेट्समुळे आणि YouTube Premium च्या किफायतशीर किमतीमुळे, YouTube Music Spotify सारख्या सर्व्हिसेसना कठीण स्पर्धा देत आहे.
