कोणत्या डिव्हाइसेस आणि व्हर्जन्स धोक्यात आहेत?
CERT-In रिपोर्टनुसार (CIVN-2025-0163), हे धोकादायक बग खालील Apple सॉफ्टवेअर व्हर्जन्सवर परिणाम करू शकतात:
iPhones: 18.6 पूर्वीचे iOS व्हर्जन
iPads: 17.7.9 आणि 18.6 पूर्वीचे iPadOS
MacBooks: macOS Sequoia (15.6 पूर्वीचे), Sonoma (14.7.7 पूर्वीचे), Ventura (13.7.7 पूर्वीचे)
Apple Watch: watchOS 11.6 पूर्वीचे
Apple TV: tvOS 18.6 पूर्वीचे
advertisement
Vision Pro: visionOS 2.6 पूर्वीचे
या बग्सचे मूळ कारण म्हणजे मेमरी हँडलिंग एरर, लॉजिक एरर आणि विशेषाधिकार व्यवस्थापनातील त्रुटी.
फोन स्लो झाला तर सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जाता? घरीच करा हे छोटंस काम, चालेल सुपरफास्ट
जोखीम काय आहे?
या बग्सचा गैरफायदा घेतला गेला तर यूझर्सना खालील जोखीमांना सामोरे जावे लागू शकते:
- खाजगी आणि संवेदनशील डेटामध्ये प्रवेश किंवा हॅकिंग
- मालवेअर किंवा कोडची रिमोट एक्झिक्युशन
- सुरक्षा फीचर्सना बायपास करणे
- डिव्हाइसचा सिस्टम क्रॅश किंवा सेवा नाकारणे (DoS) हल्ला
- संपूर्ण डिव्हाइसवरील नियंत्रण गमावणे किंवा डेटा गमावणे आणि ओळख गमावणे
- हे सर्व एकत्रितपणे तुमच्या डिजिटल जीवनासाठी आणि वैयक्तिक माहितीसाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.
Instagramवर आता सर्वच करु शकणार नाहीत Live! पहा कोण करु शकतं लाइव्ह
सुरक्षित कसे राहायचे?
- या सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी अॅपलने OTA (ओव्हर-द-एअर) अपडेट्स जारी केले आहेत. म्हणून, सर्व आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर अॅपल डिव्हाइस वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाइस त्वरित अपडेट करावे.
- अपडेट कसे करावे, Settings > General > Software Update, वर जा, उपलब्ध अपडेट इंस्टॉल करा आणि डिव्हाइस रीस्टार्ट करा.
