TRENDING:

Smartphoneमध्ये लहान मुलं सोशल मीडिया जास्त वापरताय? लगेच करा ही सेटिंग

Last Updated:

आजकाल, सर्व वयोगटातील लोकांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ आहे आणि लहान मुले देखील यापासून दूर नाहीत. परंतु मुलांसाठी पालकांनी सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Use of Social Media: आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ आहे आणि लहान मुलेही यापासून दूर नाहीत. परंतु मुलांसाठी पालकांनी सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुमचे मूल स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरत असेल, तर तुम्ही काही सेटिंग्जद्वारे त्याचा वापर सुरक्षित करू शकता. हे सेटिंग कसे चालू करायचे ते आपण पाहूया.
टेक न्यूज
टेक न्यूज
advertisement

कंटेन्ट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल्स

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, स्मार्टफोनमध्ये कंटेंट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल सेटिंग अॅक्टिव्हेट करणे खूप महत्वाचे आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमध्ये अनेक ॲप्स उपलब्ध आहेत जे मुलांसाठी नको असलेला मजकूर ब्लॉक करतात. याव्यतिरिक्त, तुम्ही YouTube आणि इतर सोशल मीडिया ॲप्सवर 'किड्स मोड' देखील सक्रिय करू शकता जेणेकरून मुले फक्त सुरक्षित कंटेंट पाहू शकतील.

advertisement

Jio ने सर्वांनाच केलं चकीत! कमी किंमतीत यूझर्सला मिळेल OTT अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन

Screen Time Limit सेट करा

मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी स्क्रीन टाइम लिमिट सेट करा. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आता हा ऑप्शन आहे. ज्यामध्ये तुम्ही ठराविक वेळेनंतर ॲप्स लॉक करू शकता. यामुळे मुलाचा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्यावर मर्यादा येईल आणि त्यांच्या डोळ्यांवर कमी ताण पडेल.

advertisement

App Pinning आणि पासकोड प्रोटेक्शन

मुलांसाठी स्मार्टफोनवर ॲप पिनिंग सेटिंग्ज वापरा. या फीचरमुळे फोनमधील फक्त एकाच ॲपवर प्रवेश मिळतो, त्यामुळे मुले इतर ॲप्समध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तसेच, सोशल मीडिया ॲप्सवर पासकोड सेट करा जेणेकरून मुले तुमच्या परवानगीशिवाय ते ॲप वापरू शकत नाहीत.

Google chrome चालवणाऱ्यांनो सावधान!एक मिनिटात चोरी होऊ शकतात बँक डिटेल्स

advertisement

Notification बंद करा

सोशल मीडियावरून वारंवार येणाऱ्या Notification मुळे मुलांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे ज्या ॲप्सचा ते खूप वापर करतात त्यांच्या Notification बंद करा. यामुळे मुले पुन्हा पुन्हा फोन चेक करणार नाहीत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मेथीची भाजी किती दिवस खाणार? नाश्त्यासाठी बनवा खमंग मेथी पुरी, रेसिपीचा Video
सर्व पहा

या सेटिंग्जचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांचा सोशल मीडिया वापर नियंत्रित करू शकता आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षितता प्रदान करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Smartphoneमध्ये लहान मुलं सोशल मीडिया जास्त वापरताय? लगेच करा ही सेटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल