Google chrome चालवणाऱ्यांनो सावधान!एक मिनिटात चोरी होऊ शकतात बँक डिटेल्स

Last Updated:

भारतातील बहुतांश लोक गुगल क्रोम वापरतात. त्या सर्व यूझर्ससाठी एक चेतावणी आहे की, त्यांनी त्यांचे ब्राउझर त्वरीत व्हर्जन 130 वर अपडेट करावे. सर्व जुन्या व्हर्जनला गंभीर धोका आहे आणि तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो.

गूगल क्रोम
गूगल क्रोम
नवी दिल्ली : इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Google Chrome साठी "उच्च" तीव्रतेचा इशारा जारी केला आहे. या चेतावणीचे कारण म्हणजे ब्राउझरमध्ये अनेक कमतरता आहेत, ज्यामुळे धोका वाढू शकतो.
मनीकंट्रोलच्या रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की, या त्रुटींमुळे बाहेरील सायबर अटॅकर्सला कमजोर सिस्टमवर आपल्या मनाप्रमाणे कोड चालवण्याची परवानगी देऊ शकतात. ज्यामुळे ते डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि लोकांची वैयक्तिक माहिती सहजपणे चोरू शकतात.
पासवर्ड, बँकिंग माहिती, पत्ते आणि इतर पर्सनल माहिती यासारख्या संवेदनशील यूझर्सच्या डेटामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी हॅकर्स या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. यामुळे आर्थिक फसवणूक आणि इतर सुरक्षा धोक्यांचा धोका वाढू शकतो. रिपोर्टनुसार, या कमजोरी Chrome चे एक्सटेंशन आणि V8 मधील “टाइप कन्फ्युजन” सारख्या विसंगतींमुळे उद्भवतात. ज्यामुळे आक्रमण करणाऱ्यांना ब्राउझरच्या सिक्योरिटीला बायपास करण्याची परवानगी मिळते.
advertisement
कोणत्या Google Chrome व्हर्जनवर परिणाम झालाय?
Windows आणि Mac साठी 130.0.6723.69/.70 आणि Linux साठी 130.0.6723.69 पेक्षा पूर्वीचे Google Chrome व्हर्जन वापरणारे यूझर्स या दोषांमुळे प्रभावित होऊ शकतात. सर्व यूझर्सना त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे Chrome ब्राउझर त्वरित अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Chrome च्या लेटेस्ट 130 व्हर्जनमध्ये या त्रुटी नाहीत.
advertisement
Google Chrome व्हर्जन 130 वर कसे अपडेट करावे?
-Google Chrome लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करण्यासाठी, या स्टेप्सचे अनुसरण करा-
-Google Chrome उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
-Help ऑप्शनवर जा आणि About Chrome निवडा.
-Google Chrome आपोआप नवीन अपडेट्स तपासेल आणि लेटेस्ट व्हर्जनला इंस्टॉल करेल.
advertisement
-अपडेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ब्राउझर रीस्टार्ट करावा लागेल. जेव्हा तुम्हाला -असे करण्यास सांगितले जाईल तेव्हाच हे करा.
अपडेट करणे का आवश्यक आहे?
आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन डेटाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, विशेषत: जेव्हा पासवर्ड आणि बँकिंग माहिती यासारख्या संवेदनशील तपशीलांचा विचार केला जातो. म्हणून, तुमचा डेटा आणि गोपनीयतेचे संरक्षण करू शकणाऱ्या कोणत्याही सिक्योरिटी अपडेट्सकडे दुर्लक्ष करू नये.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google chrome चालवणाऱ्यांनो सावधान!एक मिनिटात चोरी होऊ शकतात बँक डिटेल्स
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement