जिओ सिनेमाचे अनेक प्लॅन असले तरी येथे आम्ही तुम्हाला मासिक आणि वार्षिक अशा दोन प्लॅनविषयी सांगणार आहोत. त्याचा मंथली प्लॅन 29 रुपयांचा आहे. त्याची वार्षिक प्लॅन मिळवण्यासाठी, तुम्हाला फक्त 299 रुपये खर्च करावे लागतील.
Sim Card New Rules 2025: रिचार्ज न केल्यास किती दिवस अॅक्टिव्ह राहील सिम? नवा नियम लागू
advertisement
Jio Cinema Aap चा 29 रुपयांचा प्लॅन
Jio सिनेमाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला जाहिरातींशिवाय कंटेंट स्ट्रीम करण्याची संधी मिळते. याशिवाय 4K कंटेंट आणि ऑफलाइन पाहण्याचाही फायदा आहे. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध प्रीमियम कंटेन्ट पाहिली जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
एक्सक्लूजिव्ह सिरीज, चित्रपट, हॉलीवूड चित्रपट, लहान मुलांचे कार्यक्रम आणि टीव्ही एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे. 4K पर्यंत क्वालिटी, कंटेंट डाउनलोड करुन नंतर पाहिली जाऊ शकतात.
2024 चे फ्लॉप ठरलेले स्मार्टफोन्स, युजर्स म्हणताहेत, 'चुकूनही खरेदी करू नका, होईल पश्चात्ताप'
या प्लॅनमध्ये तुम्ही एकावेळी एकाच डिव्हाइसवर Jio सिनेमा ॲक्सेस करू शकता. मग ते टीटी असो, लॅपटॉप किंवा मोबाईल.
स्पोर्ट्स अँड लाइव्ह चॅनेल व्यतिरिक्त, इतर सर्व कंटेंट जाहिरातींशिवाय पाहिली जाऊ शकतात. Jio Cinema देखील फॅमिली प्लॅन ऑफर करते. ज्यामध्ये एक किंवा दोन नव्हे तर सर्व 4 डिव्हाइस एकाच वेळी लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतात.
जिओ सिनेमा वार्षिक प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्ही Jio सिनेमाची सर्व प्रीमियम कंटेंट चांगल्या क्वालिटीसह पाहू शकता. हा प्लॅन 299 रुपयांचा आहे आणि 12 महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला जाहिरातींशिवाय कोणतेही प्रीमियम कंटेंट पाहता येईल.