TRENDING:

क्रिकेटप्रेमींसाठी धमाका! Jio ची अनलिमिटेड ऑफर, फ्री 4K क्रिकेट आणि हाय-स्पीड इंटरनेट

Last Updated:

जिओने क्रिकेटप्रेमींसाठी 299 रुपयांच्या रिचार्जवर 90 दिवसांसाठी JioHotstar वर मोफत 4K स्ट्रीमिंग आणि 50 दिवसांसाठी JioFiber/AirFiber मोफत ट्रायलची ऑफर दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 17 मार्च 2025: 22 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. IPL तुम्हाला जर फ्रीममध्ये पाहायचं असेल तर आता रिचार्ज करण्याचं टेन्शन नाही. जिओने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. जिओने क्रिकेटप्रेमींसाठी खास प्लॅन लाँच केला आहे. 17 मार्च म्हणजे आजपासून ही ऑफर लागू होणार असून 31 मार्च अंतिम तारीख असेल.
जिओ रिचार्ज प्लॅन
जिओ रिचार्ज प्लॅन
advertisement

क्रिकेट चाहत्यांसाठी Jio ने एक मोठी घोषणा केली आहे. नवीन आणि सध्याच्या Jio SIM युजर्ससाठी खास ऑफर आणली असून, फक्त 299 रुपये किंवा त्याहून अधिकच्या रिचार्जवर क्रिकेटचा अनलिमिटेड आनंद घेता येणार आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 90 दिवसांसाठी JioHotstar वर मोफत 4K स्ट्रीमिंग, तसेच 50 दिवसांसाठी JioFiber/AirFiber मोफत ट्रायल मिळणार आहे.

advertisement

Jio ची एक्सक्लुझिव्ह अनलिमिटेड ऑफरमध्ये काय मिळेल?

Jio ग्राहकांना या ऑफरमध्ये दोन मोठ्या सुविधा मिळणार आहेत. पहिली म्हणजे, 90 दिवसांसाठी JioHotstar वर क्रिकेटचे सर्व सामने 4K दर्जात मोफत पाहण्याची संधी. दुसरी म्हणजे, JioFiber किंवा JioAirFiber ची 50 दिवस मोफत ट्रायल, ज्यामध्ये 800+ टीव्ही चॅनेल्स, 11+ OTT अॅप्स आणि अनलिमिटेड WiFi यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. यामुळे ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट आणि दर्जेदार मनोरंजनाचा लाभ घेता येईल.

advertisement

ही ऑफर कशी मिळवायची?

Jio च्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान रिचार्ज करणे आवश्यक आहे. विद्यमान ग्राहकांनी ₹299 (1.5GB/day किंवा त्याहून अधिक डेटा प्लॅन) किंवा त्याहून अधिकचा रिचार्ज करावा लागेल. नवीन Jio SIM घेणाऱ्या ग्राहकांनीही रुपये 299 किंवा त्याहून अधिक प्लॅन निवडावा लागेल. ऑफरबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी 60008-60008 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा.

advertisement

अधिक ऑफर अटी आणि शर्ती

ज्या ग्राहकांनी 17 मार्चपूर्वी रिचार्ज केले असेल, त्यांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 100 रुपये अॅड-ऑन पॅक घ्यावा लागेल. तसेच, JioHotstar चे फ्री सबस्क्रिप्शन 22 मार्च 2025 पासून सक्रिय होईल आणि 90 दिवसांसाठी व्हॅलिड असेल.

advertisement

अधिक माहितीसाठी

Jio च्या या धमाकेदार ऑफरबाबत अधिक माहितीसाठी www.jio.com ला भेट द्या किंवा जवळच्या Jio स्टोअरमध्ये संपर्क साधा. ही संधी गमावू नका आणि क्रिकेटचा आनंद फ्री मध्ये घ्या!

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
क्रिकेटप्रेमींसाठी धमाका! Jio ची अनलिमिटेड ऑफर, फ्री 4K क्रिकेट आणि हाय-स्पीड इंटरनेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल