TRENDING:

Jio च्या दोन भारी ऑफर! यूझर्सला 2 वर्ष फ्रीमध्ये मिळणार या सर्व्हिस

Last Updated:

Reliance Jio Offer: तुमच्याकडे Jio AirFiber किंवा JioFiber कनेक्शन असल्यास, कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. कंपनी आपल्या ब्रॉडबँड यूझर्सना काही निवडक प्लॅन्ससह सेवा देत आहे. जी दोन वर्षांसाठी फ्री राहतील, ही सर्व्हिस काय आहे आणि तुम्ही या ऑफरचा लाभ कसा घेऊ शकता? चला जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jio Youtube Premium Offer: मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यूझर्ससाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. Jio च्या नवीन ऑफर अंतर्गत कंपनी युजर्सना YouTube Premium चे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. रिलायन्स जिओने या ऑफरसाठी यूट्यूबशी हातमिळवणी केली आहे.
जिओ
जिओ
advertisement

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या ऑफरचा फायदा फक्त जिओ ब्रॉडबँड प्लॅनवरच मिळेल. ही ऑफर निवडक JioFiber आणि Jio AirFiber प्लॅन्ससह दिली जात आहे. जिओ ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ना रिचार्ज ना सब्सक्रिप्शन! फ्रीमध्ये असे पहा Disney Plus Hotstar वर मूव्हीज

या प्लॅन्ससह ऑफरचे फायदे

advertisement

कंपनीच्या म्हणण्यानुसार, JioFiber आणि AirFiber यूझर्सना ऑफरचा लाभ फक्त Rs 888, Rs 1199, Rs 1499, Rs 2499 आणि Rs 3499 च्या प्लॅनमध्ये मिळेल. या प्लॅन्सशिवाय, तुम्ही इतर कोणत्याही प्लॅनमधून रिचार्ज केल्यास तुम्हाला YouTube Premium चा लाभ मिळणार नाही. YouTube च्या प्रीमियम सर्व्हिससह, यूझर्सना अॅड-फ्री व्यूइंग एक्सपीरियन्स, ऑफलाइन व्हिडिओ डाउनलोड, बॅकग्राउंड प्ले आणि YouTube Music Premium मध्ये फ्री अॅक्सेस दिला जाईल.

advertisement

हे काम करावे लागेल

ऑफरचा लाभ घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला वर सांगितलेल्या प्लॅनपैकी एक निवडावा लागेल. प्लॅन खरेदी केल्यानंतर, माय जिओ अकाउंटमध्ये लॉग इन करा. यानंतर, ॲप किंवा वेबसाइटवरील YouTube Premium बॅनरवर क्लिक करा. यानंतर, तुमच्या YouTube अकाउंटमध्ये साइन इन करा आणि तुमचे अकाउंट नसेल तर प्रथम एक YouTube अकाउंट तयार करा. यानंतर तुम्ही दोन वर्षांसाठी फ्री YouTube Premium प्लॅनचा आनंद घेऊ शकाल.

advertisement

WhatsApp वर कोण करतंय तुम्हाला ट्रॅक? या भन्नाट ट्रिकने लगेच समजेल!

YouTube Premium Susbcription Price

YouTube Premium च्या मंथली प्लॅनची ​​किंमत 159 रुपये आणि वार्षिक प्लॅनची ​​किंमत 1490 रुपये आहे. या पद्धतीने पाहिले तर कंपनी तुम्हाला 2980 रुपयांचा फायदा फ्री देत आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio च्या दोन भारी ऑफर! यूझर्सला 2 वर्ष फ्रीमध्ये मिळणार या सर्व्हिस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल