रिलायन्स जिओ ही देशातली लोकप्रिय टेलिकॉम कंपनी खास दिवाळीनिमित्त ग्राहकांना फ्री इंटरनेट सुविधा देत आहे. कंपनीने यापूर्वी सप्टेंबर महिन्यात एअर फायबरसह एक वर्षासाठी मोफत इंटरनेटचा प्लॅन सादर केला होता. आता दिवाळीपूर्वी जिओकडून ग्राहकांसाठी अनेक नवीन प्लॅन सादर करण्यात आले आहेत. यातल्या एका प्लॅननुसार ग्राहकांना अनलिमिटेड डेटा प्लॅन मिळणार आहे. जे ग्राहक जास्त प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात, त्यांच्यासाठी ही सुसंधी असेल.
advertisement
रिलायन्स जिओने 101 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. जे युझर्स रोज 1 ते 1.5 जीबी डेटा सहज वापरतात आणि एकूणच त्यांचा इंटरनेटचा वापर जास्त आहे. ते या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात आणि 101 रुपयांचा प्लॅन घेऊन जास्तीत जास्त डेटा वापरू शकतात.
रिलायन्स जिओच्या 101 रुपयांच्या प्लॅनची स्पर्धा एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांशी आहे. या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहक अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतात. ज्या युझर्सच्या परिसरात 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे, तेच युझर्स अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतात. प्लॅनमध्ये 101 रुपयांत 4G कनेक्टिव्हिटीसह 6GB डेटा दिला जात आहे. हा ट्रू अनलिमिटेड अपग्रेड प्लॅन असल्याने तुम्हाला हा प्लॅन ठरावीक रिचार्ज प्लॅनसोबत वापरता येईल.
यासाठी 1.5GB प्रति दिवस डेटा देणाऱ्या प्लॅनसोबत तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करावा लागेल. ज्या प्लॅनमध्ये रोज 1.5GB डेटा मिळतो. त्याची वैधता सुमारे दोन महिने आहे, त्या प्लॅनसोबत तुम्ही 101 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करू शकता. जर तुमच्या परिसरात 5G कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकता.