Airtel 100 Plan
100 रुपयांच्या या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Hotstar चा फायदा सोबत 5 GB हाय स्पीड डेटा देखील मिळेल. 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग किंवा एसएमएसचा फायदा मिळणार नाही कारण हा डेटा प्लॅन आहे.
स्मार्टफोन चार्जिंग केल्यानंतर चार्जर सॉकेटमध्येच ठेवता ना? असं पडू शकतं महागात
advertisement
Jio 100 Plan
रिलायन्स जिओच्या या 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटाचा फायदा देखील मिळतो, परंतु या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे 100 रुपये खर्च करून तुम्हाला 30 ऐवजी 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा फायदा मिळेल. याचा अर्थ असा की तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीसारख्या कोणत्याही डिव्हाइसद्वारे 100 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी हॉटस्टार अॅक्सेस करू शकाल.
Vi 151 Plan
एअरटेल आणि जिओची तुलना करता, व्होडाफोन आयडियाचा जिओ हॉटस्टार प्लॅन 50 रुपये महाग आहे. परंतु वी प्लॅनसह तुम्हाला 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये प्रीपेड यूझर्सला 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा फायदा देण्यासोबत 4 जीबी डेटाचा फायदा मिळतो.
रिचार्ज न करता किती दिवस चालू राहतो SIM? Jio, Airtel सह Vi यूझर्स घ्या जाणून
टीप
तुमच्या नंबरवर जर प्राथमिक प्लॅन आधीच अॅक्टिव्ह असेल तरच तुम्ही Jio, Airtel, Vodafone Idea (Vi) कडून वर नमूद केलेल्या या OTT प्लॅनचे फायदे घेऊ शकाल. वर नमूद केलेल्या कोणत्याही डेटा प्लॅनसह तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळणार नाही.