रिचार्ज न करता किती दिवस चालू राहतो SIM? Jio, Airtel सह Vi यूझर्स घ्या जाणून

Last Updated:

Jio vs Airtel vs Vi: गेल्या वर्षी जुलैमध्ये दरवाढीपासून रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. खरंतर, TRAIच्या हस्तक्षेपानंतर, टेलिकॉम कंपन्यांनी फक्त व्हॉइस कॉलसह प्लॅन सादर केले आहेत.

जिओ, एअरटेल व्हिआय
जिओ, एअरटेल व्हिआय
Jio vs Airtel vs Vi: गेल्या वर्षी जुलैमध्ये दरवाढीपासून रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. खरंतर, ट्रायच्या हस्तक्षेपानंतर, टेलिकॉम कंपन्यांनी फक्त व्हॉइस कॉलसह प्लॅन सादर केले आहेत. परंतु सेकेंडरी सिम वापरणाऱ्यांसाठी हे देखील महाग असल्याचे सिद्ध होत आहे. बहुतेकदा लोक फक्त बँकिंग सेवांसाठी किंवा नेटवर्क कव्हरेजच्या सोयीनुसार दुसरे सिम ठेवतात. या कारणास्तव, कंपन्या ग्राहकांना रिचार्ज न करताही काही काळासाठी इनकमिंग कॉल आणि संदेश प्राप्त करण्याची परवानगी देतात.
SIM कधी डिअ‍ॅक्टिव्हेट केली जाते?
तुम्ही सलग 90 दिवस तुमचे सिम वापरले नाही म्हणजेच कोणताही कॉल, एसएमएस किंवा डेटा वापरला नाही, तर तुमचा नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट केला जातो. हा नियम सर्व प्रमुख कंपन्यांना लागू होतो - जसे की Jio, Airtel आणि Vi.
बॅलन्ससह व्हॅलिडिटी कशी वाढते?
90 दिवसांनंतर तुमच्या खात्यात 20 रुपयांपेक्षा जास्त बॅलेन्स राहिले, तर टेलिकॉम कंपन्या आपोआप 20 रुपये कापून घेतात आणि तुमचा वापर न करण्याचा कालावधी आणखी 30 दिवसांनी वाढवतात. तुमच्या अकाउंटमधील बॅलेन्स 20 रुपयांपेक्षा कमी होईपर्यंत ही प्रोसेस सुरू राहते. बॅलेन्स संपल्यानंतर तुमचा नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट केला जाईल.
advertisement
डिअ‍ॅक्टिव्हेट केलेला नंबर कसा अ‍ॅक्टिव्हेट करायचा?
तुमचे सिम डिअ‍ॅक्टिव्हेट केले असेल, तर तुम्हाला ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी 15 दिवस मिळतात. या कालावधीत, 20 रुपये शुल्क भरून नंबर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह केला जाऊ शकतो. तुम्ही असे केले नाही, तर तुमचा नंबर कायमचा बंद होईल आणि पुन्हा वापरता येणार नाही.
advertisement
म्हणजेच, जिओ, एअरटेल आणि व्हीआय यूझर्स रिचार्ज न करताही सुमारे 90 दिवसांपर्यंत इनकमिंग कॉल आणि मेसेजचा लाभ घेऊ शकतात. परंतु या काळात कोणतेही आउटगोइंग कॉल, डेटा किंवा एसएमएस वापरता येणार नाहीत. जर तुम्हाला तुमचे सेकंडरी सिम जास्त काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर वेळोवेळी ते वापरणे किंवा किमान बॅलेन्स राखणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
रिचार्ज न करता किती दिवस चालू राहतो SIM? Jio, Airtel सह Vi यूझर्स घ्या जाणून
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement