OnePlus 15 Series- OnePlus चा पुढील फ्लॅगशिप, OnePlus 15 सीरीज, नोव्हेंबरमध्ये लाँच होणार आहे. त्याची मायक्रोसाइट Amazon वर आधीच लाइव्ह आहे. रिपोर्ट्सनुसार, OnePlus 15 मध्ये 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली मोठी 7300mAh बॅटरी असेल.
तुम्ही बसलाय की झोपलाय? फोनला सर्वच असतं माहिती, पण कसं?
advertisement
कॅमेऱ्याच्या बाबतीत, या फोनमध्ये 50MPचा ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. लीकर Paras Guglani यांच्या मते, त्याचे जागतिक लाँच 12 नोव्हेंबर रोजी आणि भारतात 13 नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे.
OPPO Find K9 Series- Oppo Find K9 सिरीज 18 नोव्हेंबर रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोन्समध्ये 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 9500 चिपसेट असेल.
कॅमेऱ्यासाठी, यात 200MP टेलिफोटो लेन्स असेल आणि बॅटरी 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
iQOO 15- iQOO 15 चे ग्लोबल लॉन्च 25 नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे.
यात 7000mAhची मोठी बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग असेल. या डिव्हाइसमध्ये सSnapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि तीन 50-मेगापिक्सेल कॅमेरे असू शकतात, ज्यामुळे तो एक पॉवरफूल परफॉर्मन्स फोन बनेल.
ChatGPT वापरणाऱ्यांनो सावधान! दिसताय आत्महत्येसारखे लक्षणं, रिपोर्टमध्ये खुलासा
Realme GT 8 Pro - Realme GT 8 Pro स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, 2K रिझोल्यूशन डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन गेमिंग आणि हाय-परफॉर्मेंस यूझर्ससाठी डिझाइन केला आहे.
हे स्मार्टफोन देखील उपलब्ध असू शकतात
बजेट सेगमेंटमध्ये, Nothing Phone 3a Lite अंदाजे ₹20,000 ते ₹22,000 च्या श्रेणीत लाँच केला जाऊ शकतो. दरम्यान, Lava Agni 4 5G मध्ये Dimensity 8350 चिपसेट आणि 7000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.
