TRENDING:

Lava ने लॉन्च केली स्वस्त स्मार्टवॉच! AMOLED डिस्प्लेसह मिळतो GPS, पहा किंमत

Last Updated:

Lava ProWatch V1 Price in India: लावाने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. Lava ProWatch V1 कंपनीने ProWatch VN चे सक्सेसर म्हणून लॉन्च केले आहे. या वॉचमध्ये तुम्हाला सिलिकॉन आणि मेटल दोन्ही पट्ट्यांचा ऑप्शन मिळतो. यात AMOLED डिस्प्ले आहे. घड्याळात जीपीएस, 110 स्पोर्ट्स मोड आणि इतर फीचर उपलब्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देसी स्मार्टफोन मॅन्युफॅक्चर ब्रँड Lava भारतीय बाजारपेठेत सतत नवीन उपकरणे लाँच करत आहे. कंपनीने नुकताच एक हँडसेट लॉन्च केला होता. आता कंपनीने नवीन स्मार्टवॉच Lava ProWatch V1 लाँच केले आहे. कमी किमतीत या घड्याळात अनेक दमदार फीचर्स उपलब्ध आहेत.
स्मार्ट वॉच
स्मार्ट वॉच
advertisement

ProWatch V1 मध्ये 1.85-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्ट घड्याळात 2.5D GPU ॲनिमेशन इंजिन आहे. यात अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर्ससह GPS आणि IP68 रेटिंग आहे. चला जाणून घेऊया या घड्याळाची खास फीचर्स.

Samsung च्या या प्रीमियम स्मार्टफोन्सची किंमत घसरली! चेक करा बेस्ट डील्स

Lava ProWatch V1 किंमत आणि उपलब्धता

लावाने आपले नवीन स्मार्टवॉच 2399 रुपयांना लॉन्च केले आहे. ही किंमत घड्याळाच्या सिलिकॉन स्ट्रॅप प्रकारासाठी आहे. तसंच, ते इतर प्रकारांमध्ये देखील उपलब्ध आहे. लवकरच तुम्ही रिटेल स्टोअरमधून हे घड्याळ खरेदी करू शकाल. सिलिकॉन स्ट्रॅप तीन कलर ऑप्शन ब्लॅक नेबुला, ब्लूश रोनिन, मिंट शिनोबी आणि पीची हिकारीमध्ये येतो.

advertisement

त्याचा मेटल स्ट्रॅप दोन कलर आणि किमतींमध्ये येतो. Peachy Hikari Metal व्हेरिएंटची किंमत 2,699 रुपये आहे. तर Black Nebula Metal व्हेरिएंटची किंमत 2799 रुपये आहे.

कोणीच ट्रॅक करु शकणार नाही तुमचं लोकेशन! फक्त ऑन करा ही सेटिंग, अनेकांना माहितीच नाही

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

Lava ProWatch V1 मध्ये 1.85-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच Realtek 8773 चिपसेटसह येते, जे दैनंदिन वापरानुसार चांगली कामगिरी देते. हे घड्याळ ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटीसह येते.

advertisement

यात GPS चे फीचर देखील आहे. जे या बजेटच्या बहुतेक घड्याळांमधून गायब आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यात VC9213 PPG सेन्सर देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने हार्ट रेट आणि इतर आरोग्य मेट्रिक्सचे निरीक्षण केले जाऊ शकते. घड्याळ 110 स्पोर्ट्स मोडसह येते.

लावाच्या स्मार्टवॉचमध्ये योगा, रनिंग आणि इतर फीचर्स उपलब्ध आहेत. चांगली गोष्ट म्हणजे घड्याळ IP68 रेटिंगसह येते. कंपनीने ProWatch VN चे उत्तराधिकारी म्हणून लॉन्च केले आहे. कंपनीने ProWatch V1 च्या बॅटरी स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Lava ने लॉन्च केली स्वस्त स्मार्टवॉच! AMOLED डिस्प्लेसह मिळतो GPS, पहा किंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल