ते इंटरनेटशिवाय देखील हल्ला करते
मामोना पारंपारिक रॅन्समवेअरपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इतर रॅन्समवेअर रिमोट सर्व्हरवरून कमांड घेऊन काम करतात, तर मामोना कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय फायली एन्क्रिप्ट करते. विंडोज पिंग कमांडचा गैरवापर करून, ते स्थानिक एन्क्रिप्शन की तयार करते, ज्यामुळे ते एअर-गॅप्ड म्हणजेच इंटरनेटपासून पूर्णपणे वेगळ्या सिस्टममध्ये देखील प्रभावी होते.
सायबर सुरक्षा तज्ञ निहार पठारे यांच्या मते, "Mamonaसारखे रॅन्समवेअर हे सिद्ध करत आहे की ऑफलाइन सिस्टम देखील आता सुरक्षित नाहीत. हे धोकादायक सॉफ्टवेअर नेटवर्क मॉनिटरिंग टाळून कोणत्याही सुरक्षा यंत्रणेला चकमा देऊ शकतात."
advertisement
YouTube वर कधी मिळतं गोल्डन बटण? अवश्य जाणून घ्या नियम
Mamona कसा पसरतो?
सायबर तज्ञांच्या मते, ममोना सहसा यूएसबी ड्राइव्ह किंवा बाह्य हार्ड डिस्क सारख्या भौतिक उपकरणांद्वारे पसरतो. यूझर्स संक्रमित डिव्हाइस सिस्टमशी कनेक्ट करताच, हे मालवेअर ऑटोमॅटिक अॅक्टिव्ह होते. हे रॅन्समवेअर बहुतेकदा लपवलेल्या फाइल्स, ऑटो-रन स्क्रिप्ट्स किंवा अँटीव्हायरसला फसवणारे कोड वापरते. इंटरनेटपासून पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेल्या सिस्टम देखील त्यापासून सुरक्षित नाहीत, कारण त्याचा हल्ला यूझर्रच्या फिजिकल इंटरॅक्शनवर अवलंबून असतो.
ममोना सक्रिय झाल्यावर काय होते?
एकदा हे रॅन्समवेअर सिस्टममध्ये अॅक्टिव्ह झाले की, ते ऑटोमॅटिक एन्क्रिप्शन की तयार करते आणि स्क्रीनवर किंवा मजकूर फाइल म्हणून खंडणीची नोट प्रदर्शित करते. यामध्ये, यूझर्सला मोबाइल किंवा लॅपटॉपसारख्या दुसऱ्या डिव्हाइसवरून हल्लेखोराशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. कधीकधी त्यात क्यूआर कोड स्कॅन करणे किंवा ईमेल पाठवणे यासारख्या गोष्टी देखील समाविष्ट असतात.
YouTube पडेल लाइक्ससह फॉलोअर्सचा पाऊस! फक्त करु नका या 5 चुका
Mamona पकडणे कठीण का आहे?
- ते इंटरनेटशी कनेक्ट होत नाही, म्हणून पारंपारिक सुरक्षा प्रणाली ते ट्रॅक करण्यास असमर्थ असतात.
- ऑफलाइन सिस्टममध्ये अनेकदा जुने सॉफ्टवेअर असते, ज्यामुळे धोका वाढतो.
- यूझर्सना हल्ला झाल्याचे लवकर कळत नाही.
- USB पोर्ट्स बहुतेकदा असुरक्षित असतात, ज्यामुळे ते सहजपणे आत प्रवेश करतात.
- एकदा अॅक्टिव्ह झाल्यानंतर ते काढून टाकणे खूप कठीण होते.
Mamonaसारखे धोके कसे टाळायचे?
- हे उपाय करून तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात सुरक्षित ठेवू शकता.
- अज्ञात USB डिव्हाइस वापरू नका.
- ऑफलाइन देखील काम करणारा अँटीव्हायरस वापरा.
- सर्व सिस्टम नियमितपणे अपडेट ठेवा.
- महत्वाच्या डेटाचा सुरक्षित ऑफलाइन बॅकअप तयार करा.
- फाइलची नावे बदलणे, कागदपत्रे उघडत नाहीत किंवा विचित्र संदेश दिसणे हे धोक्याचे लक्षण असू शकतात.
- भौतिक डिव्हाइसशी संबंधित जोखीम आणि संशयास्पद अॅक्टिव्हिट कसे नोंदवायचे याबद्दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या.
