मीडिया रिपोर्टनुसार जपानमधील आयची प्रीफेक्चरमधील टोयोके सिटीच्या स्थानिक असेंब्लीने सोमवारी 30 सप्टेंबर रोजी एक अध्यादेश मंजूर केला. ज्यात म्हटलं आहे की, लोकांना कामाच्या किंवा अभ्यासाच्या बाहेर दररोज 2 तास मोबाईल फोन, कॉम्प्युटर किंवा टॅब्लेट वापरण्याची मर्यादा असेल.
रिपोर्टनुसार प्रशासनाने लहान मुलांना रात्री 9 नंतर स्क्रीनपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. ज्युनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आणि 18 वर्षांखालील मुलांना रात्री 10 नंतर स्क्रीनपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
Shocking! iPhone च्या नादात फेल झाली किडनी, मोबाईल घेऊन पस्तावतोय तरुण
या अध्यादेशाचा उद्देश स्क्रीन टाइम कमी करणं आणि कुटुंबातील संवाद वाढवण्यावर देखील भर देणं आहे. या नियमाबाबत टोयोकेचे महापौर मसाफुमी कौकी म्हणाले, "आम्ही स्मार्टफोनवर बंदी घालत नाही आहोत. हा कायदा केवळ आरोग्य उपायांचा एक भाग आहे. त्याचा उद्देश लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आहे जेणेकरून ते विचार करू शकतील की जास्त स्क्रीन वापर त्यांच्या झोपेवर आणि दैनंदिन दिनचर्येवर परिणाम करत आहे का.
या कायद्याबद्दल जनमत विभागले गेले आहे. काहींचं मत आहे की प्रशासनाने कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, तर काहीजण याला कौटुंबिक संवाद वाढवण्याची संधी म्हणून पाहतात.
एक लोकप्रिय नेता; पण त्याने आयुष्यात कधीच दात घासले नाही, टॉयलेटमध्ये गेला नाही, अंघोळीचाही कंटाळा
हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. पण त्याचं उल्लंघन केल्यास कोणताही दंड किंवा शिक्षा होणार नाही. कायदा सादर करताना विधानसभेने अध्यादेशाच्या प्रभावाचा आणि जनमताचा वेळोवेळी आढावा घेण्याचा आणि आवश्यक असल्यास बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली होती आणि असं करणारा तो पहिला देश बनला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाने देशभरातील शालेय वर्गात मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणांवर बंदी घातली. हा कायदा मार्च 2026 मध्ये लागू होईल.