Shocking! iPhone च्या नादात फेल झाली किडनी, मोबाईल घेऊन पस्तावतोय तरुण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kidney sold for iphone : त्याची एक किडनी काढून टाकण्यात आली. तो घरी परतला, आता त्याच्याकडे अॅपलचे गॅझेट्स होते. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. काही महिन्यांतच त्याच्या...
नवी दिल्ली : आपल्याकडे आयफोन असावा असं स्वप्न कित्येकांचं आहे. आयफोनसाठी अगदी मौल्यवान गोष्टी विकल्याचीही किती तरी प्रकरण आहेत. आयफोनसाठी किडनी विकण्याचीही कित्येकांची तयारी आहे. आयफोनचं वेड असलेलं असाच एक तरुण ज्याने आयफोनच्या नादात आपली किडनी गमावली आहे. आता त्याला पश्चाताप होतो आहे.
चीनमधील हा तरुण ज्याचं नाव वांग शांगकुन असं आहे. 2011 साली तो फक्त 17 वर्षांचा होता. तेव्हा त्याला आयफोन 4 आणि आयपॅड 2 हवं होतं. यासाठी त्याने आपली किडनीही विकली. त्याच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाला. आता जगण्यासाठी आपल्याला एक किडनी पुरेशी आहे असं त्याला वाटलं. पण त्यानंतर त्याच्यावर पश्चातापाची वेळ आली. कारण त्याची दुसरी एकमेव किडनी फेल झाली.
advertisement
आपली चूक सांगताना वांग 2011 च्या काळोख्या रात्रीची आठवण करतो. एका ऑनलाइन चॅट रूममध्ये अवयव तस्करी करणाऱ्याच्या मेसेजला तो बळी पडला. एक किडनी विका आणि 250000 रुपये मिळवा, अशी ऑफर तस्करी करणाऱ्याने दिली. वांगने विचार केला, आपल्याला एक किडनी पुरेशी आहे. तो हुनान प्रांतातील एका लहान गावात पोहोचला, जिथं त्याची एका असुरक्षित स्थानिक रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर कोणतीही काळजी घेतली नव्हती. फक्त किडनी काढून टाकण्यात आली. वांग घरी परतला, आता त्याच्याकडे अॅपलचे गॅझेट्स होते.
advertisement
पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. काही महिन्यांतच त्याच्या दुसऱ्या किडनीला इन्फेक्शन झालं. डॉक्टरांनी सांगितलं, की अस्वच्छ शस्त्रक्रियेमुळे बॅक्टेरिया पसरले होते. त्याची किडनी फक्त 25 टक्केच कार्य करत आहे. वांग कायमचा अपंग झाला. त्याला आयुष्यभर डायलिसिस मशीनवर अवलंबून राहावं लागत आहे.
advertisement
वांगची कहाणी पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, कारण आयफोन 17 प्रोच्या किमती वाढल्यामुळे अनेक तरुण पुन्हा तीच चूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर आयफोनचे नवीनतम मॉडेल लाँच झाल्यापासून अनेक तरुणांनी मानवी शरीराच्या अवयवांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांशी संपर्क साधला आहे. बरेच तरुण त्यांच्या किडन्या विकून आयफोन खरेदी करू इच्छितात. वांगची कहाणी कदाचित त्यांना भानावर आणण्यास मदत करेल.
advertisement
वांगने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं.पण आता तो इतरांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे. अजूनही अनेक तरुण अशाच चुका करत आहेत. वांग त्याच्या अनुभवातून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्याच्यासारखं दुसरं कोणीही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये.
Location :
Delhi
First Published :
October 02, 2025 1:23 PM IST