अरे हा माणूस आहे की कोण? दिवसभर मिरची खातो ती खातो, पण अंघोळही मिरचीनेच, प्रायव्हेट पार्टही धुतो
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man eat and bath with chilli : तिखट खाणाऱ्यांच्या कानातून धूर निघेल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती दिवसभर मिरची खाते, इतकंच नव्हे तर मिरचीने अंघोळ करते, अगदी प्रायव्हेट पार्टसारख्या नाजूक भागही मिरचीने धुते.
नवी दिल्ली : मला झणझणीत तिखट खायला आवडतं. असं म्हणणाऱ्यांची कमी नसेल. किती तरी लोक आहेत जे तिखट आवडीने खातात. तिखटाशिवाय आपल्याला खाल्ल्यासारखं वाटतंच नाही. काही लोक तर मिरची टराटरा चावून खातात. इतकं तिखट खाणाऱ्यांच्या कानातून धूर निघेल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती दिवसभर मिरची खाते, इतकंच नव्हे तर मिरचीने अंघोळ करते, अगदी प्रायव्हेट पार्टसारख्या नाजूक भागही मिरचीने धुते.
मेघालयातील घनदाट जंगलं, टेकड्यांवर राहणारी एक व्यक्ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील बटाव गावातील एक साधा शेतकरी राम पिर्तुह त्याच्या असाधारण क्षमतेसाठी जगभरात प्रसिद्ध झाला आहे. राम एकाच वेळी कित्येक किलोपेक्षा मिरच्या खातो. त्याच्या मिरच्या खात असल्याचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. जैंतिया टेकड्यांमध्ये मिरचीची लागवड सामान्य आहे, परंतु रामसारखा कोणीही नाही.
advertisement
2021 मध्ये राम पिर्तुहची उघडपणे लाल मिरच्या खाण्याची प्रतिभा चर्चेत आली जेव्हा तो एका स्थानिक व्हिडिओमध्ये मिरच्या खाताना दिसला. रामची जीवनशैली पाहून एखाद्याला तो सुपरहिरो असल्यासारखे वाटतं. लोक दूरदूरून सत्य जाणून घेण्यासाठी येऊ लागले. बटाव गावातील लोक म्हणतात की रामचं जेवण मिरचीवर आधारित आहे. भात, भाज्या, सर्वकाही मसालेदार आहे. सकाळी मिरची चहा, दुपारी मिरची-मटण करी आणि संध्याकाळी कच्च्या मिरच्या.
advertisement
advertisement
जेव्हा त्याची ही धक्कादायक क्षमता प्रसिद्ध झाली, तेव्हा अनेकांनी त्याची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. एका कार्यक्रमादरम्यान त्याला मिरचीच्या पेस्टने आंघोळ घालण्यात आली. त्याच्या गुप्तांगावर मिरची देखील लावण्यात आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की राम मिरच्या खातो, मिरच्याने अंघोळ करतो आणि गुप्तांगही धुतो. त्याला काहीच होत नाही. व्हिडीओत हे करून दाखवलं आहे.
advertisement
सुमारे 50 वर्षांचा राम म्हणाला, "मिरची माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मी लहानपणापासून ती खात आहे, आता मला अजिबात तिखट वाटत नाही. मिरची माझं औषध आहे. कोणताही आजार मला त्रास देत नाही"
(सूचना : हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. जो व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. व्हिडीओत करण्यात आलेल्या दाव्याची न्यूज18मराठीने पुष्टी केलेली नाही. शिवाय असं काही करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन न्यूज18मराठी करत आहे.)
Location :
Delhi
First Published :
October 02, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे हा माणूस आहे की कोण? दिवसभर मिरची खातो ती खातो, पण अंघोळही मिरचीनेच, प्रायव्हेट पार्टही धुतो