सापांनी भरलेल्या विहिरीतील ते 54 तास! महिलेने असा वाचवला स्वतःचा जीव, सगळे शॉक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman fell in Well With Snakes : जंगलात फिरत असताना एका जुन्या खोल विहिरीत पडली. ती घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
बीजिंग : साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. साप दूर जरी असेल तरी त्याची भीती वाटते. पण एक महिला मात्र अशाच सापांनी भरलेल्या विहिरीत पडली. तब्बल 54 तास ती या सापांसोबत होती. तरी ती जिवंत होती. तिने आपला जीव अशा पद्धतीने वाचवला की सगळ्यांना धक्का बसला.
चीनच्या फुजियान प्रांतातील क्वानझोऊ येथील ही घटना. 48 वर्षांची महिला क्विन असं तिच आडनाव. 13 सप्टेंबर रोजी ती जंगलात फिरत असताना एका जुन्या खोल विहिरीत पडली. ती घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबाने दुसऱ्या दिवशी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
जिनजियांग रुइटोंग ब्लू स्काय इमर्जन्सी रेस्क्यू सेंटरच्या टीमने तिला शोधण्यासाठी थर्मल इमेजिंग ड्रोनचा वापर केला. ती जुन्या विहिरीत असल्याचं समजलं आणि 15 सप्टेंबर रोजी बचावकार्य सुरू झालं. क्विन विहिरीत पडली याला तब्बल 54 तास उलटले. त्या विहिरीत डास होते आणि सापही.
advertisement
बचावकर्त्यांना किन पाण्यात बुडालेली आणि निसरड्या भेगांना पकडलेली दिसली. सुदैवाने तिला पोहता येत होतं, त्यामुळे भिंतीच्या दगडाला धरून ती पाण्यात तरंगत राहिली. त्यांनी झाडी साफ केली आणि तिला सुरक्षितरित्या बाहेर खेचलं.
54 तासांहून अधिक काळ विहिरीच्या भिंतीला चिकटून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ती थकली होती. तिच्या हातांना गंभीर दुखापत झाली आणि व्रण आले.
advertisement
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार किन म्हणाली, "असे अनेक क्षण आले जेव्हा मी निराशेने पूर्णपणे कोलमडले. विहिरीचा तळ काळा होता, डासांनी भरलेला होता आणि जवळच काही पाण्यातील सापही पोहत होते. मला खूप डास चावले, हाताला एकदा सापही चावला. सुदैवाने तो विषारी नव्हता आणि त्यामुळे कोणतंही गंभीर नुकसान झालं नाही"
"असंख्य वेळा मला हार मानावीशी वाटली. पण मग मला माझ्या 70 वर्षांच्या आईबद्दल 80 वर्षांच्या वडिलांबद्दल आणि नुकत्याच कॉलेजला सुरुवात केलेल्या माझ्या मुलीबद्दल आठवलं. जर मी त्यांना मागे सोडलं तर ते काय करतील?"
advertisement
तिला तातडीने जिनजियांग सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि पुढील उपचारांसाठी तिला क्वानझोऊ फर्स्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. किनच्या दोन फासळ्या फ्रॅक्चर झाल्या आणि एक फुफ्फुस किरकोळ निकामी झालं. अहवालानुसार, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Location :
Delhi
First Published :
October 01, 2025 1:21 PM IST