Yuck! तरुणांनी हॉटेलच्या जेवणात केली लघवी, 4000 लोकांनी खाल्लं, कुठे घडला हा प्रकार?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Urinating in restaurant food : या घटनेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर वाद निर्माण केला. नेटिझन्सनी मुलांना घृणास्पद आणि अनैतिक म्हटलं, तर काहींनी पालकांच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बीजिंग : किती तरी लोक महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा असं कधी ना कधी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. कुठे बाहेर फिरायला गेला की हॉटेलमध्ये खाणं आलंच. असंच एक हॉटेल जिथं किती तरी लोक येतात, त्या हॉटेलमध्ये घृणास्पद प्रकार घडला आहे. 2 मुलांनी तिथल्या पदार्थात लघवी केली आणि हा पदार्थ तब्बल 4 हजार लोकांनी खाल्ला.
चीनच्या शांघायमधील हे प्रकरण आहे. ही घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडली, जेव्हा 17 वर्षांची मुलं शांघायमधील हैदिलाओ आउटलेटमध्ये मित्रांसोबत मजा करत होते. वू आणि तांग अशी या मुलांची नावं. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी एक घृणास्पद प्रँक केला. त्यांनी जेवणाच्या खोलीत हॉटपॉट ब्रोथच्या भांड्यात उभं राहून लघवी केली, नंतर त्याचं शूटिंग केलं आणि ते डुयिन या चीनच्या सोशल मीडियावर पोस्ट केलं. हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला आणि देशभरात संतापाची लाट उसळली.
advertisement
व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ग्राहकांनी तक्रार केली की त्यांनी हाच पदार्थ ऑर्डर केला होता. जवळजवळ 4000 ग्राहकांनी हा पदार्थ खाल्ला. हैदिलाओने तात्काळ कारवाई केली. सर्व 4000 बाधित ग्राहकांना पूर्ण परतफेड केली आणि चौकशी करण्यासाठी स्टोअर तात्पुरतं बंद केलं. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "हा आमच्या ब्रँड प्रतिमेला मोठा धक्का आहे. आम्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो."
advertisement
या घटनेने चीनमध्ये सोशल मीडियावर वाद निर्माण केला. नेटिझन्सनी मुलांना घृणास्पद आणि अनैतिक म्हटलं, तर काहींनी पालकांच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. व्हिडिओ हटवण्यात आला, परंतु स्क्रीनशॉट प्रसारित होत राहिले.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतलं. शांघाय न्यायालयाने 16 सप्टेंबर 2025 रोजी निकाल दिला. या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीशांनी म्हटलं की, "अशा कृतींमुळे केवळ आरोग्याला धोका निर्माण होत नाही तर सार्वजनिक नैतिकतेलाही धक्का बसतो." पण ते अल्पवयीन असल्याने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली नाही त्यांना सामुदायिक सेवा आणि समुपदेशन करण्याचे आदेश दिले आणि त्यांना सोशल मीडियावर बंदी घातली.
advertisement
पण न्यायालयाने पालकांना एकत्रित 2.2 दशलक्ष युआन म्हणजे अंदाजे 2.5 कोटी रुपये दंड ठोठावला. ही रक्कम रेस्टॉरंटला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी होती, ज्यामध्ये परतफेड, तपास खर्च आणि ब्रँड नुकसान यांचा समावेश होता. ही शिक्षा चीनच्या नागरी संहितेनुसार देण्यात आली, जी अल्पवयीन मुलांसाठी पालकांना जबाबदार धरते.
advertisement
या निकालाने पालकांना धक्का बसला. वूचे म्हणाले, "आमची मुलं चुकीत अडकली. आम्ही संपूर्ण रक्कम देऊ, पण हे कुटुंबासाठी चांगलं नाही." तर तांगच्या पालकांनीही पश्चात्ताप व्यक्त केला आणि म्हटलं की, मुलांना ड्रग्जचं व्यसन लागलं आहे. कुटुंबाने सार्वजनिक माफीनामा देखील जारी केला, जो वेइबोवर पोस्ट करण्यात आला.
Location :
Delhi
First Published :
October 01, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Yuck! तरुणांनी हॉटेलच्या जेवणात केली लघवी, 4000 लोकांनी खाल्लं, कुठे घडला हा प्रकार?