75 वर्षांच्या आजोबांनी 35 वर्षीय महिलेशी केलं लग्न, सुहागरात ठरली शेवटची रात्र, सकाळी मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Old man married young woman : गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संगरु राम गेल्या काही दिवसांपासून पुनर्विवाह करण्याबद्दल बोलत होता. गावकऱ्यांनी त्यांना खूप वयस्कर असल्याचं सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला.
नवी दिल्ली : लग्न एका विशिष्ट वयात करावं असं सांगितलं जातं. तरी काही लोक वयस्कर झाले तरी लग्न करतात. असंच एक प्रकरण. एक 75 वर्षांचे आजोबा ज्यांनी अवघ्या 35 वर्षीय महिलेशी लग्न केलं. पण सुहागरातची पहिली रात्रच त्याची शेवटची रात्र ठरली. सकाळी त्याचा मृत्यू झाला. असं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील जौनपूर ही धक्कादायक घटना. संगरू आणि मानभावती असं या कपलचं नाव. कुचमुच गावात राहणारे 75 वर्षांचे संगरू राम, ज्यांनी जलालपूरमधी 35 वर्षीय मानभावतीशी लग्न केलं. संगरू हे शेतकरी. त्यांचं आधी लग्न झालं होतं. पहिल्या पत्नीचं एक वर्षापूर्वीच निधन झालं होतं. पण त्यांना मुलंही नव्हती. ते एकटेच राहत होते. त्यांचा भाऊ आणि पुतण्या दिल्लीत राहतात आणि तिथं व्यवसाय करतात.
advertisement
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संगरु राम गेल्या काही दिवसांपासून पुनर्विवाह करण्याबद्दल बोलत होता. गावकऱ्यांनी त्यांना खूप वयस्कर असल्याचं सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. सोमवारी त्यांनी कोर्टात लग्न केलं त्यानंतर मंदिरात लग्न केलं.
मानभावतीचंसुद्धा हे दुसरं लग्न होतं. तिला पहिल्या लग्नापासून 2 मुली आणि 1 मुलगा देखील आहे. मनभावती म्हणाली की, संगरू रामने तिला घर सांभाळायला आणि तो मुलांची काळजी घेईल, असं सांगितलं होतं. रात्री उशिरापर्यंत ते बोलत राहिले. सकाळी अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
advertisement
या घटनेने गावात खळबळ उडाली. संगरु रामच्या पुतण्यांनी हे प्रकरण संशयास्पद असल्याचं म्हणत अंत्यसंस्कार थांबवले आणि आता चौकशीची मागणी केली जात आहे.
Location :
Delhi
First Published :
October 01, 2025 12:03 PM IST
मराठी बातम्या/Viral/
75 वर्षांच्या आजोबांनी 35 वर्षीय महिलेशी केलं लग्न, सुहागरात ठरली शेवटची रात्र, सकाळी मृत्यू