आजोबांनी ठेवलं नातीचं नाव! कोर्टात पोहोचलं प्रकरण, पालकांची होणार DNA टेस्ट, पण का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
For Biological Relation Girls Parents Dna test : एका अनोख्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीचं जन्म प्रमाणपत्र बदलण्यासाठी पालकांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : आपल्या बाळाचं नाव हटके आणि युनिक असावं असं अनेकांना वाटतं. बाळाच्या जन्माआधीपासूनच नावं ठरवली जातात. मुलगी झाली तर हे नाव आणि मुलगा झाला तर ते नाव... बाळासाठी नावं सुचवणाऱ्यांचीही कमी नसते. कुणाचे आईवडील, कुणाची आत्या, कुणाची मावशी, कुणाचे मामी-मामी, कुणाचे काका-काकी किंवा कुणाची आजी-आजोबा त्यांचं नाव ठेवतात. अशीच एक मुलगी जिचं नाव तिच्या आजोबांनी ठेवलं. हे प्रकरण आता कोर्टात पोहोचलं आहे. आता मुलीच्या पालकांची डीएनए टेस्ट होणार आहे. मुंबईतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
एका अनोख्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीचं जन्म प्रमाणपत्र बदलण्यासाठी पालकांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी आंतरधर्मीय विवाह केला होता, जो तिच्या आजोबांना मान्य नव्हता. त्यांच्या मनाच्या विरोधात हे लग्न झालं होतं.
जेव्हा ही मुलगी आईच्या पोटात होती आणि तिच्या आईला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा आजोबांनी कोणालाही न सांगता तिच्या आईचं नाव रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये वेगळे लिहिलं. नातीचं आडनावदेखील चुकीचं लिहिलं गेलं होतं. त्यावेळी कुणाचं इकडे लक्ष गेलं नाही. पण आता ही मुलगी दहावीला गेली आहे. तिने अपार आयडीसाठी अर्ज केला तेव्हा शाळा प्रशासनाला ही तफावत लक्षात आली.
advertisement
यामुळे मुलीला हॉल तिकीट मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून तिने प्रथम बीएमसीच्या जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्राच्या नोंदी पाहणाऱ्या उपनिबंधकांशी संपर्क साधला. उपनिबंधकांनी स्वतःच्या नोंदींवर आधारित जन्म प्रमाणपत्रात सुधारणा करण्यास नकार दिला. त्यामुळे तहसीलदारांनीही प्रमाणपत्रात सुधारणा करण्यास नकार दिला. आता तिचे आजाबोही हयात नाहीत.
advertisement
आता पालक आणि मुलीचे जैविक संबंध सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणीशिवाय पर्याय उरला नव्हता. यासाठी त्यांनी जेजे हॉस्पिटलशी संपर्क साधला. प न्यायालयाच्या आदेशाशिवाय ही चाचणी करू शकत नाही, असं हॉस्पिटलने सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले.
advertisement
कोर्टात बीएमसीच्या वकिलाने सांगितलं की अल्पवयीन मुलीच्या जन्माच्या नोंदी बीएमसीच्या नोंदींशी जुळत नाहीत. म्हणून नवीन जन्म प्रमाणपत्र नाकारण्यात आलं. पण जर डीएनए अहवालात अल्पवयीन मुलीचे तिच्या पालकांशी जैविक संबंध सिद्ध झाले तर नवीन जन्म प्रमाणपत्र जारी केलं जाईल.
सुनावणीदरम्यान खंडपीठाला कळवण्यात आलं की कामा हॉस्पिटलमध्ये डीएनए चाचणी सुविधा नाहीत, म्हणून खंडपीठाने पालकांना कलिना येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्याचे निर्देश दिले.
Location :
Delhi
First Published :
October 01, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/Viral/
आजोबांनी ठेवलं नातीचं नाव! कोर्टात पोहोचलं प्रकरण, पालकांची होणार DNA टेस्ट, पण का?