कामी येईल हे फीचर
व्हॉट्सॲप हे अतिशय उपयुक्त ॲप आहे. पण, घोटाळेबाज त्याचाही गैरवापर करतात. साधारणपणे असे दिसून येते की लोक व्हॉट्सॲपवर येणारे कॉल सहज उचलतात. कारण लोकांना वाटते की, हा कॉल त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी केला असावा. म्हणूनच स्कॅमर व्हॉट्सॲप कॉल करून लोकांचे लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपचे एक फीचर अतिशय उपयुक्त आहे, ज्याचे नाव Protect IP address in calls आहे.
advertisement
फक्त 7 हजारात Smart Tv खरेदीची भारी संधी! पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर
हे फीचर काय करते?
प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉल्स फीचर हे WhatsApp वर तुमची प्रायव्हसी मजबूत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे फीचर WhatsApp वर येणारे कॉल थेट WhatsApp सर्व्हरद्वारे रूट करते. ज्यामुळे तुमचे लोकेशन ट्रॅक करणे कठीण होते. हे फीचर तुमचे स्थान लपवून तुमच्या प्रायव्हसीचे संरक्षण करते. यामुळे कॉल हॅक होण्याचा धोका कमी होतो.
Redmi Note 12 Pro वर 43% डिस्काउंट! Flipkart वर मिळतोय स्वस्तात
हे फीचर कसे इनेबल करावे?
1. तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.
2. होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन उभ्या डॉट्संवर क्लिक करून सेटिंग्जवर जा.
3. यानंतर प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा.
4. नंतर स्क्रीन खाली स्क्रोल करा आणि Advanced options वर क्लिक करा.
5. येथे तुम्हाला प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉल्स ऑप्शन मिळेल. ते ऑन करा.