Flipkart Minutesवरील ऑफर
फ्लिपकार्टच्या या नवीन सर्व्हिसचं नाव फ्लिपकार्ट मिनिट्स आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या जुन्या फोनची नेमकी किंमत जाणून घेऊ शकता. तो तुमच्या घरून उचलू शकता आणि त्याच दिवशी नवीन स्मार्टफोन देखील खरेदी करू शकता. सध्या ही सुविधा दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूच्या काही निवडक भागात सुरू करण्यात आली आहे, परंतु कंपनी म्हणते की जुलैपासून ही सेवा उर्वरित भारतातही सुरू केली जाईल.
advertisement
Amazon Prime मेंबरशीप मिळतेय अगदी स्वस्तात! पुन्हा मिळणार नाही अशी संधी
किंवा जर तुम्ही वेबसाइटवर नवीन फोन शोधत असाल तर तुम्हाला “Exchange” हा ऑप्शन दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही तुमच्या जुन्या फोनची माहिती भरू शकता - जसे की त्याचा ब्रँड, मॉडेल आणि त्याची स्थिती. तुम्ही हे डिटेल्स प्रविष्ट करताच, तुम्हाला अंदाजे एक्सचेंज किंमत दिसेल. यानंतर, फ्लिपकार्टचा एक्सचेंज एक्सपर्ट थोड्याच वेळात तुमच्या घरी पोहोचेल, तुमचा फोन तपासेल आणि तेथून तो घेईल.
तुम्हाला उत्तम एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल
या प्रोसेसची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही खराब स्थितीत असलेला फोनही एक्सचेंज करू शकता. तुमच्या फोनची स्क्रीन तुटली असेल किंवा तो योग्यरित्या काम करत नसेल, तर तुम्ही त्याच्या स्थितीनुसार 50% पर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकता.
तुम्ही कसे एक्सचेंज करू शकता
तुम्हालाही या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या आवडत्या नवीन स्मार्टफोनच्या प्रोडक्ट पेजवर जा. तिथे “Exchange” चा ऑप्शन शोधा, नंतर “Check Price” वर क्लिक करा. आता तुमच्या जुन्या फोनचा ब्रँड आणि मॉडेल निवडा, त्याची स्थिती आणि येणारी किंमत सांगा. जर तुम्ही सहमत असाल, तर एक्सचेंज कन्फर्म करा आणि ऑर्डर द्या. बस्स, काही मिनिटांतच नवीन फोन तुमच्या हातात येईल.
