प्रोडक्टची डेट फक्त एक दिवस शिल्लक असेल तर कंपन्या तारीख काढून वस्तू विकत आहेत. हे तपासात उघड झाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने दक्षिण दिल्लीतील एका युनिटला सील केले आहे. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, अन्न विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की काही काळापूर्वी एका व्यक्तीने तक्रार केली होती की त्याला बुरशी असलेला ब्रेड देण्यात आला आहे.
advertisement
Apple ने बदलली शॉपिंगची स्टाइल! Video Call ने खरेदी करु शकाल iPhone
कंपनीचा परवाना रद्द
तपास सुरू झाला तेव्हा यात तथ्य आढळून आले. ब्रेडची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यानंतर एक टीम तयार करण्यात आली आणि ब्रेड पुरवठा करणाऱ्या कंपनीची चौकशी करण्यात आली परंतु कंपनीत सर्व काही ठीक होते. सुरुवातीच्या तपासात हे सर्व एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीत सुरू असल्याचे उघड झाले आणि जेव्हा हे उघड झाले तेव्हा कंपनीचा परवाना एका महिन्यासाठी रद्द करण्यात आला.
अशीच आणखी एक घटना समोर आली ज्यामध्ये डिलिव्हरी कंपनीने गार्लिक ब्रेडची तारीख काढून टाकली होती. या प्रकरणात चौकशी सुरू आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही पहिलीच घटना नाही, दरमहा असे 4 ते 5 प्रकरणे समोर येत आहेत.
WhatsApp सह Telegram वापरणाऱ्यांनो सावधान! नव्या ट्रिकने केली जातेय फसवणूक, असा करा बचाव
तुम्हाला खराब प्रोडक्ट मिळाल्यास काय करावे?
तुम्हाला कालबाह्य झालेले उत्पादन मिळाले तर प्रथम ई-कॉमर्स कंपनीशी संपर्क साधा आणि परतफेड मागा. जर कोणताही उपाय न झाल्यास, तुम्ही ग्राहक संरक्षण एजन्सीकडे तक्रार करू शकता, कालबाह्य झालेले उत्पादने केवळ व्यवसाय आणि ग्राहकांमधील विश्वासघातच नाही तर ग्राहक संरक्षण कायद्यांचे उल्लंघन देखील आहेत.
तक्रार कशी करावी
जर अन्न वितरण कंपनी तुमची तक्रार ऐकत नसेल, तर तुम्हाला अन्न सुरक्षा विभागाकडे 1800113921 या क्रमांकावर तक्रार करावी लागेल.
