TRENDING:

Samsung च्या या प्रीमियम स्मार्टफोन्सची किंमत घसरली! चेक करा बेस्ट डील्स

Last Updated:

Amazon Samsung Smartphone Deals: तुम्ही देखील सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तीन डिव्हाइस सध्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत. चला या बेस्ट डील्सबद्दल जाणून घेऊया

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Samsung Galaxy S24 Series Price Drop: सॅमसंग लवकरच त्याची नवीन Galaxy S25 सीरीज लॉन्च करणार आहे. दावा केला जात आहे की या सीरीजअंतर्गत यावेळी चार नवीन डिव्हाइस लॉन्च केली जातील. परंतु कंपनीने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. कंपनीने नुकतीच लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. यावेळी 22 जानेवारी रोजी नवीन S25 सीरीज लॉन्च होणार आहे. मात्र, ही नवीन सीरीज सुरू होण्यापूर्वीच सध्याच्या सीरीजमधील 3 डिव्हाइस स्वस्त झाली आहेत. होय, Amazon सध्या Samsung Galaxy S24, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra वर मोठी सूट देत आहे. या तिन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या विशेष ऑफर्सवर एक नजर टाकूया.
सॅमसंग गॅलेक्सी
सॅमसंग गॅलेक्सी
advertisement

Samsung Galaxy S24 5G

Samsung ने मागच्या वर्षी Samsung Galaxy S24 5G लाँच केला होता 64,999 रुपयांना पण आता हा फोन कोणत्याही बँक ऑफरशिवाय फक्त 50,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला फोनवर थेट 14 हजार रुपयांची सूट मिळत आहे, जी खूप मोठी घसरण आहे. एवढेच नाही तर फोनवर एक विशेष एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे ज्यातून तुम्ही 42,750 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुम्ही आयफोनची एक्सचेंज केल्यास, तुम्हाला चांगले एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते.

advertisement

कोणीच ट्रॅक करु शकणार नाही तुमचं लोकेशन! फक्त ऑन करा ही सेटिंग, अनेकांना माहितीच नाही

Samsung Galaxy S24 Plus 5G

S24 सीरीजमधील इतर डिव्हाइस देखील Amazon वर अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. कंपनीने हा डिवाइस 99,999 रुपयांना सादर केला होता. परंतु सध्या हा फोन फक्त 64,490 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच या फोनवर 35 हजार रुपयांपेक्षा जास्त सूटही मिळत आहे. तर नो कॉस्ट ईएमआय सोबत तुम्ही फक्त 2,903 रुपये दरमहा फोन तुमचा बनवू शकता. एक्सचेंज ऑफरसह तुम्ही या फोनवर 53,200 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसंच, तुमचे जुने डिव्हाइस चांगले असेल तरच तुम्हाला हे मूल्य मिळेल.

advertisement

फक्त 7 हजारात Smart Tv खरेदीची भारी संधी! पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Samsung Galaxy S24 Ultra 5G

या सीरीजमधील सर्वात महागडे मॉडेल देखील सध्या अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने गेल्या वर्षी हा डिवाइस 1,34,999 रुपयांना लॉन्च केला होता पण आता हा फोन फक्त 1,04,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट देखील दिसत आहे. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसह, तुम्ही डिव्हाइसवर 3,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देखील मिळवू शकता. एक्सचेंज ऑफरसह तुम्ही या फोनवर 53,200 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Samsung च्या या प्रीमियम स्मार्टफोन्सची किंमत घसरली! चेक करा बेस्ट डील्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल