Sightful कंपनीच्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणजे कंपनीने जगातील पहिला एआर लॅपटॉप तयार केला आहे जो एआर ग्लासेसच्या मदतीने 100 इंचाचा व्हर्च्युअल डिस्प्ले दाखवतो. या लॅपटॉपचे नाव Spacetop G1 आहे, चला जाणून घेऊया या लॅपटॉपमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत, हे लॅपटॉप कसे काम करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लॅपटॉपची किंमत काय आहे?
advertisement
Sightful Spacetop G1 ची फीचर्स
100 इंचाच्या व्हर्च्युअल स्क्रीन आणि क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा लॅपटॉप ग्राफिक्ससाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन QCS8550 सह KRYO CPU आणि Adreno 740 GPU वापरतो. या लॅपटॉपमध्ये 16 जीबी LPDDR5 रॅम आणि 128 जीबी UFS3.1 स्टोरेज वापरला आहे.
Sightful Spacetop G1असं काम करतो
या लॅपटॉपमध्ये 2 यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय 7, 5जी (नॅनो-सिम आणि ई-सिम सपोर्ट) आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन 5.3 सपोर्ट आहे. लॅपटॉपमध्ये 60Wh बॅटरी आहे, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर बॅटरी 8 तास चालते असा दावा केला जातो. एआर ग्लासेसबद्दल बोलायचे झाले तर, हे ग्लासेस स्पष्ट आणि उच्च-रिझोल्यूशन ओएलईडी डिस्प्ले पॅनल्ससह येतात. साइटफुल स्पेसटॉप जी१ अशा प्रकारे काम करते
iPhone 17 लॉन्चपूर्वी अगदी स्वस्त झाला iPhone 16! पहा कुठे मिळतेय बंपर ऑफर
Sightful Spacetop G1 Price
एआर तंत्रज्ञानासह येणाऱ्या या अद्भुत लॅपटॉपची किंमत कंपनीने 1700 डॉलर(सुमारे 1,42,035 रुपये) निश्चित केली आहे परंतु सहसा हा लॅपटॉप 1900 डॉलर (सुमारे 1,58,745 रुपये) मध्ये विकला जातो. भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी असे काहीतरी कधी लाँच करता येईल की नाही याबद्दल सध्या काहीही सांगता येत नाही.
