YouTube Musicमध्ये आलं Speed Dial फीचर; कसं करतं काम, फायदे काय?
फोन हॅक होण्याची चिन्हे
विचित्र ॲप्स - तुमच्या फोनवर तुम्ही कधीही इन्स्टॉल न केलेले ॲप्स इन्स्टॉल केले असल्यास, ते तुमचा फोन हॅक झाल्याचे लक्षण असू शकते.
बॅटरी झपाट्याने संपत आहे - जर तुमचा फोन पूर्वीपेक्षा खूप वेगाने डिस्चार्ज होत असेल तर हे स्मार्टफोन हॅक झाल्याचे लक्षण असू शकते. कदाचित कोणीतरी बॅकग्राउंड डेटा वापरत आहे.
advertisement
फोन चालू किंवा बंद होणे - तुमचा फोन कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून चालू किंवा बंद होत असेल तर, हे देखील एक लक्षण असू शकते की कोणीतरी तुमचा फोन रिमोटली कंट्रोल करत आहे.
Jio ने वाढवलं BSNL चं टेन्शन! 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात लॉन्च केले 2 रिचार्ज प्लॅन
अचानक डेटा संपणे - तुमचा डेटा पॅक कोणत्याही कारणाशिवाय खूप लवकर संपत असेल, तर असे होऊ शकते की कोणीतरी तुमचा डेटा वापरत आहे.
फोन स्लो होत आहे - जर तुमचा फोन पूर्वीपेक्षा खूप हळू झाला असेल, तर कदाचित कोणीतरी बॅकग्राउंडमध्ये प्रोसेसर वापरत असेल.
पॉप-अप जाहिराती - जर अचानक तुमच्या फोनवर खूप पॉप-अप जाहिराती दिसू लागल्या, तर हे फोन हॅक झाल्यामुळे देखील असू शकते.
अनोळखी नंबरवरून कॉल येणे - फोन चालू असताना तुम्हाला अज्ञात नंबरवरून कॉल प्राप्त होऊ शकतात.
तुमचा फोन हॅक झाल्यास काय करावे?
अनोळखी ॲप्स हटवा - तुमच्या फोनमधून सर्व अनोळखी ॲप्स ताबडतोब हटवा.
फॅक्टरी रीसेट - जर तुमचा फोन हॅक झाला असेल तर तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करू शकता.
पासवर्ड बदला - सर्व ऑनलाइन अकाउंटचे पासवर्ड त्वरित बदला. विशेषत: तुम्ही तुमच्या फोनवरून लॉग इन केलेल्या अकाउंटचे पासवर्ड.
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा - चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि तुमचा फोन नियमितपणे स्कॅन करा.
