TRENDING:

फोनवर टेंपर्ड ग्लास लावणाऱ्यांनो आधी हे वाचा! या 5 गोष्टी माहिती नसल्यास होईल नुकसान 

Last Updated:

Tempered Glass: आपल्या प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची सुरक्षा करण्यासाठी आपण स्क्रीन प्रोटेक्टर लावत असतो. या स्क्रीन प्रोटेक्टरचेही विविध प्रकार आहे. प्रत्येकजण आपल्या हिशोबाने तो निवडत असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई  : स्मार्टफोन हा आता आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनलाय. कारण कुठेही पेमेंट करायचं असो, ऑटो बुक करायची असो किंवा मग ऑफिसचं काम असो या सर्वांसाठी स्मार्टफोन हा आवश्यक असतो. अशावेळी फोनची स्क्रीन सुरक्षित ठेवणं खुप गरजेचं होतं. स्क्रीन फुटू नये किंवा मग स्क्रॅच पडू नयेत म्हणून आपण स्क्रीन प्रोटेक्शन वापरतो. अनेक लोक टेंपर्ड ग्लासचा वापर करतात. पण योग्य ग्लास निवडणे आणि ती योग्य पद्धतीने लावणं खुप गरजेचं असतं. अनेकदा लहान-लहान चुका तुमच्या फोनची सेफ्टी कमकुवत करू शकतात.
टेम्पर्ड ग्लास
टेम्पर्ड ग्लास
advertisement

आपल्या गरजेनुसार ग्लास निवडा 

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन प्रोटेक्टर उपलब्ध आहेत. प्रत्येकाचा वापर वेगळ्या गरजेनुसार केला जातो. टेंपर्ड ग्लास सामान्यतः सुरक्षेसाठी ओळखली जाते आणि फोन पडल्यावर स्क्रीनचा बचाव करण्यात मदत करते. तुम्ही गेमिंग जास्त करत असाल किंवा मग उन्हात फोनचा जास्त वापर करत असाल तर मॅट फिनिशचा ग्लास बेस्ट ठरतो. कारण यात रिफ्लेक्शन कमी असतं आणि बोटांचे ठसे खुप कमी दिसतात.

advertisement

LinkedIn वर सेफ नाही तुमचा डेटा! रिपोर्टमध्ये झाला खुलासा, पाहा नेमकं प्रकरण काय

तसंच प्रायव्हसी ग्लास अशा लोकांसाठी योग्य आहे, ज्यांना त्यांची स्क्रीन कोणालाच दिसू नये असं वाटतं. यासोबतच कर्व्ड डिस्प्लेच्या स्मार्टफोनसाठी यूव्ही ग्लास जास्त बेस्ट मानला जातो. कारण तो स्क्रीनवर चांगल्या प्रकारे फिट बसतो.

ग्लास खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं 

advertisement

टेंपर्ड ग्लास खरेदी करताना त्याची क्वालिटी खुप महत्त्वाची ठरते. 9H हार्डनेसचा ग्लास जास्त मजबूत मानला जातो. यावर चावी, नाणीसारख्या वस्तूंमुळे स्क्रॅच होत नाहीत. सोबतच 2.5D किंवा 3D एजेसचा ग्लास फक्त दिसायलाच बेस्ट नाही तर वापरासाठी जास्त आरामदायक असतो. यासोबतच ओलियोफोबिक कोटिंग ग्लास निवडणं फायदेशीर ठरतं. कारण हा स्क्रीनवर बोटांचे ठसे आणि तेलाचे डाग कमी करतो. तसंच फूल ग्लूच्या ग्लासला प्राधान्य द्यायला हवं. कारण बॉर्डर ग्लू ग्लासमध्ये अनेकदा टच रिस्पॉन्स कमकुवत होतो आणि धूळ जमा होण्याची समस्या राहते.

advertisement

इंडक्शन कूकटॉपचे असतात 3 प्रकार! चुकीचं खरेदी केल्यास पैसे जातील वाया, पाहा कोणता बेस्ट

इंस्टॉलेशन दरम्यान स्वच्छता गरजेची असते 

टेंपर्ड ग्लास लावताना सर्वात मोठी चूक लोक स्वच्छतेमध्ये करतात. स्क्रीनवर थोडीही धूळ असली तर ग्लासच्या खाली बबल्स तयार होतात. हे खराब दिसतात. यासोबतच लवकर ग्लास निघते. यामुळे ग्लास लावण्यापूर्वी स्क्रीन चांगली स्वच्छ करुन घ्यायला हवी.

advertisement

योग्य ग्लास घेतल्याने फोन राहतो सुरक्षित 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षे उद्योगात क्रांती होणार, पुणेकर शास्त्रज्ञांचा खास शोध, कसा आणि कुणाला फायदा? Video
सर्व पहा

तुम्ही योग्य टेंपर्ड ग्लास निवडला आणि तो योग्य पद्धतीने लावला तर तुमच्या फोनची स्क्रीन दीर्घकाळ सुरक्षित राहू शकते. लहान-लहान गोष्टींकडे लक्ष ठेवून तु्म्ही तुमच्या स्मार्टफोनला चांगली सुरक्षा देऊ शकता. तसंच वारंवार स्क्रीन बदलण्याची समस्या तुम्हाला येणार नाही.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फोनवर टेंपर्ड ग्लास लावणाऱ्यांनो आधी हे वाचा! या 5 गोष्टी माहिती नसल्यास होईल नुकसान 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल