कूलिंग पॅड
जुन्या लॅपटॉप्समध्ये ओव्हरहिटिंगची समस्या येणे सामान्य गोष्ट आहे. हेवी टास्क आणि अनेकदा बेसिक टास्कच्या दरम्यानही लॅपटॉप गरम होतात. ज्यामुळे पूर्ण सिस्टम स्लो होते. एयरफ्लो वेंट्स बंद होणे आणि कंप्यूटर फॅन काम करत नसल्याने अशी परिस्थिती येते. यापासून बचावासाठी तुम्ही कूलिंग पॅडचा वापर करु शकता. कूलिंग पॅड तुमच्या लॅपटॉपला गरम होण्यापासून वाचवेल.
advertisement
एक्सटर्नल माउस आणि कीबोर्ड
जास्त वेळपर्यंत लॅपटॉप वापरल्याने कीबोर्ड खराब होण्याचे चान्सेस असतात. अनेक कीज काम करणे बंद करतात आणि ट्रॅकपॅडही खराब होते. अशावेळी कीबोर्ड रिप्लेस करणे एक महागडा ऑप्शन ठरु शकतो. याजागी तुम्ही एक्सटर्नल कीबोर्ड आणि माउस यूज करुन प्रॉब्लम दूर करु शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही कीबोर्ड न बदलता ही समस्या स्वस्तात सोडवू शकता.
दुप्पट चालेल फोनची बॅटरी! फक्त ऑन करा ही हीडन सेटिंग, होईल फायदा
USB हब
8-10 वर्षे जुन्या लॅपटॉपमध्ये जास्त USB पोर्ट नसायचे. जर एखाद्यामध्ये पोर्ट्स मिळाले तर ते लेटेस्ट स्टँडर्डला सपोर्ट करत नाही. याच कारणामुळे एकाच पोर्टमध्ये वारंवार डिव्हायसेस प्लग-इन आणि प्लग-आउट करावं लागत होतं. तुम्हीही अशाच समस्येचा सामना करत असाल तर यूएसबी हब एक सोपा उपाय असू शकतो. USB हबमध्ये तुम्ही एकाचवेळी अनेक डिव्हायसेसने प्लग-इन करु शकाल.
मोटोरोलाचा डबल धमाका! बुक-स्टाइल फोल्डेबल फोन लॉन्च, पाहा फीचर्स
एक्सटर्नल स्टोरेज
जुन्या लॅपटॉपमध्ये स्टोरेज कमी येत होते. ज्यामुळे ते लवकर फूल होत होते. स्टोरे फूल झाल्याने हे लॅपटॉपच्या स्पीडवरही परिणाम करते. तुम्हीही स्टोरेजच्या कमतरतेचा सामना करत असाल तर एक्सटर्नसल स्टोरेज तुमचं काम सोपं करेल. बाह्य स्टोरेजसाठी तुम्हाला दोन पर्याय सापडतील: HDD आणि SSD. HDD अधिक परवडणारे आहेत, ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक फाइल्स आणि गेम्स साठवता येतात, तर SSD अधिक महाग असतात परंतु अधिक विश्वासार्ह आणि वेगवान असतात.
