पण नेमकी हे eSIM असतं तरी काय? आणि ती पारंपरिक सिमपेक्षा कशी वेगळी आहे? ते तसं काम करतं? चला जाणून घेऊया.
eSIM म्हणजे काय आणि ती कशी काम करते?
eSIM म्हणजे Embedded SIM, म्हणजेच फोनच्या आत बसवलेली डिजिटल सिम. ती काढता येत नाही, बदलता येत नाही, पण ती नेटवर्क प्रोव्हायडरकडून QR कोड किंवा नेटवर्क सेटिंगच्या माध्यमातून सहज अॅक्टिवेट करता येते. म्हणजेच, आता सिम कार्ड हाताळण्याची किंवा ट्रे उघडण्याची काही गरज नाही.
advertisement
सर्वात खास बाब म्हणजे, eSIM मध्ये तुम्ही एकाच फोनवर अनेक नेटवर्क प्रोफाइल्स ठेवू शकता. जसे एकाच फोनमध्ये Jio, Airtel आणि Vi आणि हवे तेव्हा फक्त सेटिंग बदलून नेटवर्क स्विच करता येते.
पारंपरिक सिमपेक्षा eSIM कशी वेगळी?
फिजिकल सिम मध्ये कार्ड घालावे किंवा काढावे लागते, तर eSIM पूर्णपणे सॉफ्टवेअर बेस्ड असते.
नेटवर्क बदलण्यासाठी कार्ड बदलण्याची गरज नसते, फक्त काही सेकंदात सेटिंग बदलून हे काम होतं.
सिम ट्रे नसल्यामुळे फोन अधिक वॉटरप्रूफ आणि कॉम्पॅक्ट बनवता येतो.
eSIM चे फायदे काय आहेत?
सिम कार्ड न काढता नेटवर्क बदलणे शक्य.
सुरक्षा: फोन हरवल्यास eSIM लगेच ब्लॉक करता येते.
सिम ट्रे नसल्याने फोनचा डिझाइन अधिक पातळ आणि आकर्षक होतो.
अनेक नेटवर्क्स: एकाच eSIM मध्ये अनेक नेटवर्क प्रोफाइल्स ठेवता येतात.
eSIM चे तोटे काय?
मर्यादित सपोर्ट: सध्या सर्वच स्मार्टफोन किंवा नेटवर्क eSIM सपोर्ट करत नाहीत.
ट्रान्सफरची अडचण: फोन खराब झाल्यास किंवा रिपेअरला दिल्यास eSIM ट्रान्सफर करणे थोडे गुंतागुंतीचे ठरू शकते.
सेटअप अवघड: ज्यांना टेक्नॉलॉजीची सवय नाही, त्यांच्यासाठी eSIM सेटअप करणे थोडं कठीण असू शकतं.
भारतात eSIM ची उपलब्धता
सध्या भारतात Jio, Airtel, आणि Vi (Vodafone Idea) हे प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्स eSIM सेवा देत आहेत. ही सुविधा सध्या iPhone, Samsung Galaxy, Google Pixel, आणि काही Motorola मॉडेल्समध्येच उपलब्ध आहे. मात्र, आगामी काळात बजेट फोन मध्येही eSIM सपोर्ट येण्याची शक्यता आहे, कारण कंपन्या हळूहळू फिजिकल सिम स्लॉट हटवण्याच्या तयारीत आहेत.
एकंदरीत, eSIM ही स्मार्टफोनच्या भविष्यासाठी मोठी पायरी ठरणार आहे. ती फोन अधिक सुरक्षित, आकर्षक आणि वापरायला सोपी बनवते. मात्र, अजून काही मर्यादा आणि तांत्रिक अडचणी दूर झाल्या की eSIM हे तंत्रज्ञान प्रत्येकाच्या हातात असणाऱ्या फोनचा भाग बनणार, हे नक्की.
