TRENDING:

WhatsApp Chat Secrets : बॉयफ्रेंड कोणला पाठवतो सगळ्यात जास्त फोटो-व्हिडीओ? मिनिटांत कळेल सत्य, वापरा WhatsApp चं हे फीचर

Last Updated:

WhatsApp Chat Secrets : व्हॉट्सॲपवर सक्रिय असताना तुमच्या मनातही कधी हा विचार आला आहे का की, तुमचा पार्टनर किंवा खास व्यक्ती व्हॉट्सॲपवर सर्वाधिक कोणाशी बोलतो? किंवा सर्वात जास्त फोटो-व्हिडिओ कोणासोबत शेअर करतो?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन आणि त्यातही व्हॉट्सॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच लोक हे वापरतात. अगदी कॅज्युअल चॅट्सपासून ते ऑफिसच्या महत्वाच्या गोष्टी इथेच डिस्कस केल्या जातात. त्यामुळे हे आपल्या फोनमधील आणि आयुष्याचील सगळ्यात महत्वाचं ऍप आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण, व्हॉट्सॲपवर सक्रिय असताना तुमच्या मनातही कधी हा विचार आला आहे का की, तुमचा पार्टनर किंवा खास व्यक्ती व्हॉट्सॲपवर सर्वाधिक कोणाशी बोलतो? किंवा सर्वात जास्त फोटो-व्हिडिओ कोणासोबत शेअर करतो?

जर हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपमध्येच एक असे खास आणि सोपे फीचर लपलेले आहे, जे हे 'गुपित' मिनिटांत उघड करू शकते. चला, व्हॉट्सॲपच्या या सेटिंगबद्दल आणि ते कसे वापरावे याबद्दल जाणून घेऊया.

advertisement

व्हॉट्सॲपचे स्टोरेज मॅनेजमेंट फीचर

तुमचा पार्टनर सर्वात जास्त कोणाच्या संपर्कात आहे, हे शोधण्यासाठी व्हॉट्सॲपने दिलेले मॅनेज स्टोरेज (Manage Storage) हे फीचर खूप उपयोगी आहे. हे फीचर आपल्याला हे दाखवते की कोणत्या चॅटमध्ये सर्वाधिक डेटा (फोटो, व्हिडिओ, मेसेजेस) शेअर झाला आहे. डेटा जास्त म्हणजे संभाषण जास्त, असा अंदाज तुम्ही लावू शकता.

advertisement

या माहितीच्या आधारे, व्हॉट्सॲपवर सर्वाधिक चॅटिंग कोणत्या व्यक्तीसोबत झाली आहे, हे तुम्ही सहजपणे ओळखू शकता.

या सोप्या स्टेप्स फॉलो करा

हे गुपित उघड करण्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप उघडा.

स्क्रीनवर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन उभ्या डॉट्स वर क्लिक करा आणि सेटिंग्ज पर्याय निवडा.

advertisement

सेटिंग्ज मध्ये तुम्हाला स्टोरेज आणि डेटा हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

आता मॅनेज स्टोरेज (Manage Storage) या पर्यायावर क्लिक करा.

मॅनेज स्टोरेज सेक्शन उघडल्यावर, तुमच्या समोर चॅटची एक संपूर्ण यादी दिसेल.

गुपित कसे उघड होते?

या यादीत, ज्या व्यक्तीचे नाव सर्वात वर असेल किंवा ज्याच्या नावापुढे सर्वात जास्त MB/GB मध्ये डेटा दाखवला जात असेल, त्याच व्यक्तीसोबत सर्वाधिक फोटो, व्हिडिओ आणि मेसेजची देवाणघेवाण झाली आहे. म्हणजेच, ती व्यक्ती तुमच्या पार्टनरच्या सर्वाधिक संपर्कात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं लावलं डोकं, डाळिंबाच्या बागेत घेतलं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात
सर्व पहा

तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरने अलीकडेच जर काही जुना डेटा डिलीट केला असेल, तर या यादीतील क्रमवारी बदलू शकते. त्यामुळे, ही माहिती केवळ एक अंदाज असू शकते.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp Chat Secrets : बॉयफ्रेंड कोणला पाठवतो सगळ्यात जास्त फोटो-व्हिडीओ? मिनिटांत कळेल सत्य, वापरा WhatsApp चं हे फीचर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल