तुम्ही व्हॉट्सॲपचे पोल फीचर वापरत असाल तर आता तुमचा अनुभव बदलणार आहे. व्हॉट्सॲपच्या पोल फीचरमध्ये आतापर्यंत यूजर्सना फक्त टेक्स्टमध्ये पोल करण्याचा ऑप्शन होता, पण आता यात बदल होणार आहे. आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरबद्दल सविस्तर माहिती देऊ.
Jio च्या दोन भारी ऑफर! यूझर्सला 2 वर्ष फ्रीमध्ये मिळणार या सर्व्हिस
advertisement
WABetaInfo ने माहिती दिली
व्हॉट्सॲप पोलमध्ये येणाऱ्या नवीन फीचरची माहिती WABetaInfo या कंपनीच्या अपडेट्स आणि आगामी फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटने शेअर केली आहे. वेबसाइटच्या नवीन रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, कंपनी आपल्या बीटा यूझर्सना Android व्हर्जन 2.25.1.17 साठी नवीन प्रकारची सुविधा प्रदान करणार आहे.
WABetaInfo ने खुलासा केला आहे की, व्हॉट्सॲप पोलमध्ये आता टेक्स्टसह फोटोंचा ऑप्शन असेल. म्हणजे आता युजर्स फोटोच्या माध्यमातूनही मतदान करू शकतील. व्हॉट्सॲपच्या आगामी अपडेटमध्ये यूझर्स पोलमधील मजकुरासोबत फोटो अटॅच करू शकतील. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, व्हॉट्सॲप पोलचे हे फीचर अशा परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते जिथे सर्व काही केवळ टेक्स्टमध्ये सांगता येत नाही.
ना रिचार्ज ना सब्सक्रिप्शन! फ्रीमध्ये असे पहा Disney Plus Hotstar वर मूव्हीज
WABetaInfo नुसार, हे फीचर सध्या विकासाच्या टप्प्यात आहे आणि कंपनीने ते बीटा यूझर्ससाठी चाचणीसाठी आणले आहे. तसंच, चाचणी पूर्ण होताच ते सामान्य यूझर्ससाठी आणले जाईल अशी अपेक्षा आहे.